भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या धरमशाला याठिकाणी खेळला जात आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्याची नामेफेक पाहुण्या इंग्लंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 218 धावांवर गुंडाळले. कुलदीप यादव पहिल्या डावात हिरो ठरला, ज्याने पाच विकेट्स नावावर केल्या. सोबतच कुलदीपच्या नावावर एक खास विक्रम देखील नोंदवला गेला.
इंग्लंडची धावसंख्या 100 असेपर्यंत त्यांनी केवळ एक विकेट गमावली होती. पण त्यानंतर पुढच्या 118 धावा करताना 9 इंग्लिश फलंदाजांनी एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने सामन्याच्या पहिल्या डावात 15 षटके गोलंदाजी करून 72 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. याचसोबत कुलदीपने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 50 विकेट्स देखील पूर्ण केल्या.
कुलदीपच्या नावावर खास विक्रम –
कसोटी कारकिर्दीतील 50 विकेट्सचा टप्पा कुलदीपने पार केलाच. पण ही कामगिरी सर्वात कमी चेंडूत करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर झाला. अवघे 1871 चेंडू टाकल्यानंतर कुलदीपने 50 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. याआधी सर्वात कमी चेंडूत 50 कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम अक्षर पटेल याच्या नावावर होता. अक्षरने 2205 चेंडूत ही कामगिरी केली होती. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहने 2465 चेंडूत ही कामगिरी केली आहे.
सर्वात कमी चेंडूत 50 कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज –
1871 – कुलदीप यादव
2205 – अक्षर पटेल
2465 – जसप्रीत बुमराह
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
(Kuldeep Yadav became the Indian bowler to take 50 Test wickets in the fewest balls)
महत्वाच्या बातम्या –
Video: शुभमन नव्हे, हा तर ‘सुपरमॅन’! चित्त्यासारखं मागे धावत जाऊन घेतला बेन डकेटचा शानदार झेल
IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा..! इंग्लंड नेस्तानाबूत, भारतीय संघ मजबूत स्थितीत