भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) धरमशाला स्टेडियमवर सुरू होत आहे. रविचंद्रन अश्विन या सामन्यासाठी उपलब्ध आहे. तत्पूर्वी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन अर्थ्यातून बाहेर पडला होता. दिग्गज भारतीय फिरकीपटूच्या पत्नीने आता राजकोट कसोटीतून अश्विन अचानक घरी का आला, याचे कारण सांगितले. अश्विनची पत्नी प्रीती नारायण त्यावेली चेन्नईला आपल्या घरी होती.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला गेला. 15 ते 18 फेब्रुवारी यादरम्यान हा सामना पार पडला. भारताने 434 धावांनी हा सामना जिंकला. पण रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने हा सामना संपूर्ण खेळला नाही. कौटुंबिक कारणास्तव त्याने सामना अर्ध्यात सोडला आणि घरी परतला. आता अश्विनची पत्नी प्रीति नारायनकडून फिरकीपटू घरी परतण्याचे कारण समजले आहे. अश्विनने राजकोट कसोटीतून घरी परतण्याआदी आपल्या 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या.
प्रीती नारायण (Prithi Narayanan) हिने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “100व्या कसोटीसाठी जिकती उत्सुकता आहे, त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती 499व्या विकेटवेळी होती. आमचे कुटुंब तेव्हा खूप चिंतेत होते. राजकोट कसोटी सुरू असताना मुलं शाळेतून आली आणि पाच मिनिटात त्याने 500 विकेट्स पूर्ण केल्या. त्यानंतर आम्ही लोकांसोबत फोनवर बोलत होतो. तितक्यात मला अचानक आंटी ओरडल्याचा आवाज आला. त्या खाली पडल्या होत्या आणि काहीच वेळा आम्ही रुग्णालयात पोहोचलो होतो. आम्ही अश्विनला हे न सांगण्याचा निर्णय घेतला. कारण चेन्नई आणि राजकोटदरम्यान विमानसेवा चांगली नव्हती.”
अश्विनच्या पत्नीने पुढे असेही सांगितले की, “त्यामुळे मी चेतेश्वर पुजाराला फोन केला आणि त्याच्या कुटुंबाकडून खूप सहकार्य मिळाले. आम्हाला येण्याचा मार्क मिळाल्यानंतर मी अश्विनला फोन केला. आंटींच्या स्कॅननंतर डॉक्टरांनी देखील असा सल्ला दिला होता की, त्यांचा मुलगा जवळ असला पाहिजे. फोन केल्यानंतर तो खूप निराश होता आणि त्याने कॉल कट केला.”
“त्याने आपल्या आईला आयसीयूमध्ये पाहिले तेव्हा तो खूप भावूक करणारा क्षण होता. आईची तब्येत थोडी सुधारल्यानंतर आम्ही त्याला पुन्हा संघात सामील होण्याचा सल्ला दिला. तो ज्या पद्धतिचा व्यक्ती आहे, त्याने अशाप्रकारे सामना कधीच सोडला नसता. संघाने हा सामना जिंकला नसता, तर त्याला अजूनच वाईट वाटले असते. त्यावेळी मला असे जाणवले की, आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवण्याची इच्छा त्याची आहे. जसजसे वय वाठत आहे, तशी ती इच्छा देखील वाढत आहे,” असेही तिने सांगितले
दरम्यान, आईच्या दुखापतीची बातमी अश्विनला सांगण्याआधी प्रीतिने पुजाराला फोन केल्याचे यातून समोजते. माहितीनुसार पुजारा कुटुंबियांसह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही याविषयी अश्विनच्या आधी माहिती मिळाली होती. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या मदतीने अश्विनचा घरापर्यंतचा पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली, असेही सांगितले जात आहे. (Ashwin, who was emotional seeing his mother in the ICU, his wife called Pujara and asked for help)
महत्वाच्या बातम्या –
मुंबई शहर ने विजयाचा खात उघडला, तर जालना संघाचा सलग दुसरा पराभव
पाकिस्तान आर्मीसोबत सराव करणार बाबर सेना! वाचा काय आहे पीसीबीची नवी रणनीती