---Advertisement---

Ranji Trophy 2024 । फायनलमध्ये रंगणार मुंबई-विदर्भ थरार, उपांत्य सामन्यात मध्य प्रदेश पराभूत

Vidarbha Ranji team
---Advertisement---

विदर्भ संघ रणजी ट्रॉफी 2024च्या अंतिम सामन्यात पोहोचला. बुधवारी (6 मार्च) उपांत्य सामन्यात विदर्भ संघाकडून मध्ये प्रदेशला 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील हा सामना शनिवारी (2 मार्च) सुरू झाला होता. दुसऱ्या डावात यश राठोड याने शतकी खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभी करू दिली. प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघ 321 धावांचे लक्ष्य गाठू शकला नाही. आता अंतिम सामन्यात विदर्भ आणि मुंबई संघ आमने सामने असतील, जो 8 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल.

विदर्भ संघासाठी उपांत्य सामन्यात यश राठोड सामनावीर ठरला. यशने पहिल्या डावात 17 धावांवर विकेट गमावली, पण दुसऱ्या डावात त्याने 200 चेंडूत 141 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मध्य प्रदेशसाठी आवेश खान याने पहिल्या डावात 4, तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. पण वेगवान गोलंदाज आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेऊ शकला नाही. हिमांशू मंत्री यानेही पहिल्या डावात मध्य प्रदेशसाठी 126 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक विदर्भ संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात विदर्भने 170, तर दुसऱ्या डावात 402 धावा केल्या. दुसरीकडे मध्य प्रदेश संघ पहिल्या डावात 252, तर दुसऱ्या डावात 258 धावांपर्यंत मजल मारू शकला. मध्य प्रदेशला शेवटच्या डावात विजयासाठी 321 धावा हव्या होत्या. पण विदर्भसाठी यश ठाकूर आणि अक्षय वखारे यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. आदित्य सरवटे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी मुंबईने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूविरुद्ध एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवला होता. यावर्षीच्या रणजी हंगामात अंतिम सामना गाठणारा पहिला संघ मुंबई होता. तर बुधवारी मध्य प्रदेशला मात देत विदर्भ अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. (Vidarbha reached the final after defeating Madhya Pradesh in the Ranji Trophy 2024 semi-final)

महत्वाच्या बातम्या – 
पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एकूण 194 खेळाडू सहभागी
न्यूझीलंडच्या दिग्गजावर निवृत्तीसाठी बळजबरी! माजी कर्णधाराचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---