भारतीय क्रिकेट संघाचे सर्वकालीन महान फिरकीपटू म्हणून हरभजन सिंग व रविचंद्रन अश्विन यांचे नाव घेतले जाते. दोघांच्याही नावे कसोटी क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक बळींची नोंद आहे. हरभजन निवृत्त झालेल्या गोष्टीला तीन वर्षाचा कालावधी लोटून गेला असून, अश्विन आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. अशात आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एक गंभीर आरोप केला आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राहिलेल्या अजमल याने एका मुलाखतीत नुकतेच आयसीसीवर शरसंधान साधले. त्याच्यामध्ये आयसीसीने त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद म्हणून त्याच्यावर अन्याय केला. त्याचवेळी इतर गोलंदाजांना सूट देत फेकी गोलंदाजी करत असताना देखील, गोलंदाजी करण्याची परवानगी दिली. तो म्हणाला,
“मी 448 आंतरराष्ट्रीय बळी मिळवल्यानंतर आयसीसीला वाटले की मी फेकी गोलंदाजी करतो. खरंतर मुरलीधरन निवृत्त झाल्यानंतर आयसीसीने गोलंदाजी नियमात काही बदल केले. श्रीलंकेतील एका रेफ्रीकडून मला याबाबत माहिती मिळाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून गेलेल्यांपैकी आता मी वीस-पंचवीस लोकांची नावे सांगू शकतो, ज्यांची गोलंदाजी शैली संशयास्पद होती. मुरलीधरन, हरभजन सिंग, अश्विन नरीन यांच्यासारखे मोठे गोलंदाज त्यामध्ये सामील आहेत. इतकेच नव्हे तर वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोजही खांद्याला झटका देत गोलंदाजी करायचे.”
अजमल याने पाकिस्तानचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. 2014 मध्ये संशयास्पद गोलंदाजी शैली वरून त्याला गोलंदाजी करण्यास बंदी आणण्यात आली होती. अखेर 2017 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो समालोचक व क्रिकेट प्रशिक्षक अशा भूमिका बजावतो.
(Pakistan Veteran Saeed Ajmal Said Ashwin And Harbhajan Are Chucking Ball)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीवरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड! अखेरच्या दिवशी विजय 6 बळी दूर
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात