सोमवार, २ जुलैला डब्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयसीसीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
अलिकडील काळात वाढलेल्या बॉल टेंम्परींग आणि मैदानावर वाढलेल्या खेळाडूंच्या असभ्य वर्तणुकीच्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने या घटनांना लगाम बसावा या दृष्टीने कडक योजना आणि शिक्षेची तरतूद केली आहे.
यातील खेळाडूंचा स्टंम्प माइकमधील आवाज प्रसारित करण्याच्या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथल लायनने ‘द अनप्लेएबल’ या पॉडकास्टमध्ये विविध मते मांडली.
“मला बॉल टेंम्पंरींग बद्दलच्या शिक्षेत वाढ केली त्याबद्दल काही हरकत नाही. मात्र स्टंप्समध्ये कैद झालेला आवाज प्रसारित करण्याचा निर्णय मला पटलेला नाही.” असे लायन म्हणाला.
“ज्यावेळी तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असता त्यावेळी तुमच्यावर दडपण असते. त्यामुळे अशा परिस्थितीत खेळाडूंच्या तोंडातून अपशब्द जावू शकतात. माझ्या मते मैदानावर जे काही घडते ते मैदानावरच राहिले पाहिजे.” असे नॅथन लायन म्हणाला.
आयसीसीच्या सर्वसाधारण सभेत बॉल टेंम्परींग प्रकरणात दोषी अाढळलेल्या खेळाडूला इथून पुढे ६ कसोटी सामने किंवा १२ एकदिवसीय सामन्यांच्या बंदीची शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच इथून पुढे मैदानावरील स्टंप्समध्ये खेळाडूंचा कैद झालेला आवाजही प्रसारित करण्यात येणार आहे. यामुळे खेळाडूंच्या मैदानावरील शेरेबाजीला आळा बसेल असे आयसीसीचे मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-किंग कोहली आणि राहुलचे हे आहे रोनाल्डो स्टाईलने सेलिब्रेशन कनेक्शन
-मास्टर ब्लास्टर खूपच कमी गोलंदाजांचे असे कौतुक करतो!