SA20 2025 मध्ये पार्ल रॉयल्सने प्रिटोरिया कॅपिटल्सचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात रॉयल्सकडून जो रूटने शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी दाखवl संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना रॉयल्स संघाने 140 धावा केल्या. यानंतर, प्रिटोरिया संघ 20 षटकांत फक्त 129 धावा करू शकला.
पार्ल रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर लुहान ड्रिस प्रिटोरियस खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जो रूटने धावा करण्याची जबाबदारी घेतली. त्याने 56 चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकारांसह 78 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 29 धावांचे योगदान दिले. भारताचा दिनेश कार्तिक या सामन्यात फलंदाजी करत नव्हता. या खेळाडूंमुळेच रॉयल्स संघाला 140 धावा करण्यात यश आले.
यानंतर, परेल रॉयल्सच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी दाखवली. जो रूटने त्याच्या चार षटकांच्या कोट्यात 32 धावा देत 2 बळी घेतले. त्याच्या व्यतिरिक्त, डुनिथ वेल्लागे, मुजीब उर रहमान, ब्योर्न फोर्टुइन आणि नकाबायोम्झी पीटर यांनी प्रत्येकी चार षटके टाकली. प्रिटोरिया कॅपिटल्सचे फलंदाज या फिरकी गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत.
🚨 HISTORY BY PAARL ROYALS. 🚨
– Paarl Royals becomes the first franchise to use 20 overs of spin in a T20 match. 🤯 pic.twitter.com/Up9hJVvoQB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 25, 2025
SA20 2025 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पार्ल रॉयल्सने स्पिनरला संपूर्ण 20 षटके टाकायला लावली. पार्ल रॉयल्स टी20 फ्रँचायझी क्रिकेटमधील पहिला संघ बनला ज्याचे सर्व षटके फिरकी गोलंदाजांनी टाकले आणि सामना जिंकले. टी20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये हे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते.
हेही वाचा-
तिलक वर्माने रचला विश्वविक्रम, शेवटच्या 4 डावात नाॅट-आऊट, खेचल्या एवढ्या धावा
Padma Awards; टीम इंडियाच्या ‘वाॅल’ला पद्मभूषण, या खेळाडूंनाही मिळणार सन्मान
भारताचा फिरकी जादूगार रविचंद्रन अश्विनला पद्मश्री पुरस्कार जाहीर…!