भारतीय क्रिकेट संघात जागा मिळणे आणि जागा मिळाल्यानंतर ती टिकवून ठेवणे, हे युवा आणि अनुभवी क्रिकेटपटूंसमोरचे सर्वात मोठे आव्हान असतो. नुकतीच भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी १९ सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात अनेक नवख्या क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे. सोबतच निवडीची आस धरुन बसलेल्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे हदयही तुटले आहे. असा एक निवड न झालेला फलंदाज मनदिप सिंग याने आपले दु:ख व्यक्त केले आहे.
वयाच्या तिशीत असलेल्या मनदिपला श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात स्थान मिळण्याची अपेक्षा होती. परंतु संघ घोषणेनंतर त्याच्या अपेक्षांचा चुराडा झाला. यानंतर त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपले दु:ख व्यक्त करताना त्याने हाताला पट्टी बांधलेला आणि हाताने चेहरा झाकलेला फोटो पोस्ट केला. या फोटोवरुन आपली कठोर मेहनत आणि त्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न त्याने केला असल्याचे दिसून येते.
या फोटोवरील कॅप्शनमध्ये त्याने ‘कोणालाही माझी काळजी नाही. पण मी अधिकाधिक मेहनत घेत राहणार,’ असे लिहिले आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण
महत्त्वाचे म्हणजे, मनदिपने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० सामन्यात त्याला संधी मिळाली होती. या सामन्यात ११४.८१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने ३१ धावा चोपल्या होत्या. त्याच टी२० मालिकेत त्याने पुढे अजून २ टी२० सामने खेळले. त्यानंतर ती टी२० मालिका त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका ठरली.
मनदिपने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन दमदार राहिले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ४ डावात १८५ च्या शानदार फलंदाजी सरासरीने १८५ धावा चोपल्या होत्या. पंजाब किंग्जच्या मनदिपने आयपीएलमध्ये १०४ सामन्यात १६७७ धावांची कामगिरी केली आहे. तरीही भारतीय संघ निवडकर्ते त्याच्यावर दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लंका दहन करण्यासाठी मराठमोळा ऋतुराज सज्ज; म्हणाला, ‘आता सर्वोत्कृष्ट द्यायचं’
पाकिस्तानी अष्टपैलूला आयपीएलची ऑफर देण्यासाठी केकेआरचा संघमालक शाहरुखने गाठलं होतं लंडन
ओळखा पाहू! आज क्रिकेटविश्वाला वेड लावणारे स्टार भारतीय क्रिकेटपटू, बालपणी दिसत होते ‘असे’