भारतात क्रिकेट हा एक खेळ नसून भारतीय लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी नेहमीच भारतीय खेळाडूंना फॉलो करत असतात. त्यांनी कसे कपडे घातले?, ते कुठे फिरायला गेले? किंवा त्यांची प्रेमकथा, वाढदिवस आणि त्यांचे फोटो अशा खूप गोष्टी क्रिकेटप्रेमींना जाणून घ्यायच्या असतात. भारतात क्रिकेटला खूप महत्व दिले जाते. तसेच तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनासुद्धा तितकेच महत्व असते. हेच स्टार क्रिकेटपटू लहानपणी कसे दिसत असतील, याची नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. आजच्या बातमीतून आपण भारतीय खेळाडूंच्या लहानपणीच्या आठवणीना उजाळा देऊया.
विराट कोहली– फोटोत दिसणारा हा चिमुरडा भारतीय संघाचा ‘कोहिनूर’ म्हणजे विराट कोहली आहे. विराट कोहलीचा जन्म दिल्ली येथे झाला. विराटच्या वडिलांनी, विराटचे क्रिकेटप्रती प्रेम पाहिले आणि त्याला क्रिकेट कोचिंगसाठी पाठवले. तिथेच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. आज कोहली क्रिकेट जगाच्या त्या टोकावर पोहोचला आहे, जिथे जाण्यासाठी खूप क्रिकेटर स्वप्न पाहत असतात. कोहलीने २५४ एकदिवसीय सामन्यात १२१६९ धावा, ९१ कसोटी सामन्यात ७४९० आणि ९० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३१५९ धावा केल्या.
रोहित शर्मा– या फोटोत दिसणारे छोटे बाळ हा भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितचा जन्म नागपूरला झाला. पण शिक्षण आणि क्रिकेटसाठी तो आपल्या काकांकडे मुंबईला राहिला. लहानपणापासून तो मुंबईत क्रिकेट शिकू लागला आणि पुढे जाऊन तो मुंबई रणजीसाठी खेळला. रोहितने एकदिवसीय सामन्यात ३ वेळा २००हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याने भारतासाठी २२७ एकदिवसीय सामन्यात ९२०५ धावा, ३८ कसोटी सामन्यात २६१५ धावा आणि १११ टी-२० मध्ये २८६४ धावा केल्या आहेत.
रिषभ पंत– या फोटोत दिसणारा मुलगा (डावीकडे) सध्याचा घडीला युवा ‘सिक्सर किंग’ म्हणून प्रसिद्ध आहे. या मुलाचे नाव आहे रिषभ पंत. पंतचा जन्म ४ ऑक्टोबर १९९७ रोजी रुरकी येथे झाला. लहानपणापासुन क्रिकेटची आवड असल्या कारणाने तो उत्तराखंडवरून दिल्लीला आला आणि तिथेच क्रिकेट शिकला. पंतने १८ एकदिवसीय सामन्यात ५२९ धावा, ३२ टी-२० सामन्यात ५१२ धावा आणि ७६ आईपीएल सामन्यात २२९२ धावा केल्या. पंत आईपीएलमधून उगवलेला खेळाडू आहे, जो सध्याचा भारतीय संघाचा महत्वाचा यष्टीरक्षक आहे.
आर अश्विन– या फोटोतला स्मितहास्य देणारा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून, आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा आर अश्विन आहे. चेन्नईमध्ये जन्म झालेल्या अश्विनने चेन्नईमध्येच क्रिकेटचे धडे गिरवले. सुरुवातीला फलंदाजी करणारा अश्विन नंतर गोलंदाजीच्या रूपाने भारतीय संघासाठी खेळला. आजवर अश्विनने ७८ कसोटी सामन्यात २६५६ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात ५ शतकांसह त्याने ४०० हून अधिक बळी टिपले आहेत.
रवींद्र जडेजा– अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपास आलेला या फोटोतील मुलगा म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजा मूळचा जामनगर गुजरात मधला. जडेजाने तिथेत क्रिकेटचे धडे घेतले. जडेजा सौराष्ट संघासाठी रणजी ट्रॉफी खेळली. रणजी सामन्यात ३ वेळा ३०० धावा केल्या. असे करणारा एकमेव खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजाने भारतीय संघासाठी भरवी अशी कामगिरी केली आहे.
मयंक अगरवाल– या फोटोतील गोंडस बाळ म्हणजे सध्याचा खेळाडू मयंक अगरवाल आहे. मयंकचा जन्म १६ फेब्रुवारी १९९१ रोजी बंगळूरू, कर्नाटक येथे झाला. उजव्या हाताचा हा फलंदाज भारतीय संघासाठी आपले नाव कमवत आहे. आईपीएलपासून प्रसिद्ध झालेला मयंक आता भारतीय संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करतो आहे. मयंकने भारतीय संघासाठी ५ एकदिवसीय आणि १४ कसोटी सामने खेळले आहे.
शार्दुल ठाकूर- या फोटोत हातवारे करणारा मुलगा मुंबईचा ‘पालघर एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध झालेला शार्दुल ठाकूर आहे. रणजी आणि आईपीएलच्या सामन्यात प्रदर्शन करून त्याने भारतीय संघात आपले स्थान मिळवले. शार्दुलने आजवर भारतीय संघासाठी २२ टी-२० सामने खेळले. त्यात त्याने ३१ गडी बाद केले आहेत. १५ एकदिवसीय सामन्यात २२ गडी बाद केले आणि केवळ २ कसोटी सामन्यात ७ गडी बाद केले आहे. शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला भरीव अशी कामगिरी केली होती.
जसप्रीत बुमराह– ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा हा फोटो. आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वाना घाम फोडणारा जसप्रीत बुमराह सध्या भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराहने भारतीय संघासाठी आजवर १९ कसोटी सामने खेळले आहे आणि त्यात त्याने ८३ गडी बाद केले आहे, ६७ एकदिवसीय सामन्यात १०८ गडी बाद केलेआणि ५० टी-२० सामन्यात ५९ गडी बाद केले आहे.
अजिंक्य रहाणे– कराटेच्या कपड्यात दिसणारा हा मुलगा आपला मुंबईकर अजिंक्य रहाणे आहे. अजिंक्यचा जन्म ६ जून १९८८ रोजी संगमनेर येथे झाला. रणजी सामन्यातून वर आलेला हा खेळाडू सध्या भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आहे. अजिंक्यने भारतीय संघा साठी ९० एकदिवसीय सामन्यात २९६२, ७३ कसोटी सामन्यात ४५८३ आणि २० टी-२० सामन्यात ३७५ धावा केल्या.
शुभमन गिल– इरफान पठाणसोबत उभा असलेला मुलगा म्हणजे भारतीय संघाचा उगवता तारा शुभमन गिल आहे. गिलचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी झाला. १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात गिलने सुंदर फलंदाजी केली होती. गिलसुद्धा भारतीय संघात आपले नाव कमवण्या साठी खूप मेहनत घेतो आहे. गिलने ४८ आईपीएल सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ३०.६च्या सरासरीने १०७१ धावा केल्या आहे.
इशांत शर्मा– डाव्या बाजूला उंच मुलगा दिसत आहे तो इशांत शर्मा आहे. इशांत सुद्धा १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकापासून नावारूपास आला. दिल्लीमध्ये जन्म झालेल्या इशांतने दिल्लीमध्येच आपले क्रिकेटचे धडे घेतले. आणि रणजी सामनेसुद्धा दिल्लीकडून खेळला. इशांतने भारतीय संघा साठी १०१ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ३०३ बळी टिपले आहे.
मोहम्मद सिराज– गरिबीतून वर आलेला हा गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या भारतीय संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करतो आहे. सिराजचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबाद येथे झाला. सिराजला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. सुरुवातीच्या काळात तो टेनिस चेंडूने क्रिकेट खेळत असे. आईपीएल मधल्या आरसीबी संघातून नावारूपास आलेल्या सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जबदस्त गोलंदाजी केली होती. सिराजने आजवर ५ कसोटी, १ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आजारी वडिलांना घेऊन खूप भटकलो, परंतु डॉक्टरांनी दार उघडले नाही,’ कोहलीने सांगितली दु:खद आठवण