मागील अनेक दिवसांपासून रिषभ पंतला(Rishabh Pant) टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या अनेकदा चूकिचे फटके मारुन बाद होण्यावर अनेकांनी टीका केली आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) यांनी त्याला शानदार खेळाडू म्हणत पाठिंबा दिला आहे.
हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ‘पंत वेगळा आहे. तो शानदार आहे आणि तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो. जेव्हा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचा विषय असतो, विशेषत: टी20 मध्ये असे खूप कमी खेळाडू आहेत; मी यातील 5 खेळाडूंना निवडू शकत नाही. त्यामुळे त्याच्याबाबतीत आमच्याकडे पुरेसा संयम आहे.’
‘तूमचे सर्व मीडिया रिपोर्ट्स आणि सर्व तज्ञ पंतबद्दल लिहितात पण तो सध्या या भारतीय संघाबरोबर योग्य स्थितीत आहे. तज्ञांना त्यांचे काम आहे, त्यामुळे ते बोलू शकतात. पंत हा विशेष खेळाडू आहे आणि त्याने पुरेसा चांगला खेळ केला आहे. तो शिकेल. संघ व्यवस्थापन त्याला शेवटपर्यंत पाठिंबा देईल.’
याआधी शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी पंत पुन्हा पुन्हा चूका करत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, असे म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना शास्त्री म्हणाले, ‘मी म्हणालो होतो की चूक केली तर मी त्याला सांगेल. मी इथे फक्त तबला वाजवण्यासाठी आहे का? पण तो शानदार खेळाडू आहे. तो आक्रमक होऊन खेळू शकतो. आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देऊ.’
सध्या पंत दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. पण तो लवकरच 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…तर कर्णधार विराट कोहलीवर ओढावू शकते बंदीची नामुष्की
–मराठमोळ्या पंकज मोहितेची प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मोठी कामगिरी, केला हा पराक्रम
…म्हणून रोहित शर्माच्या संघाच्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ झाला रद्द