टी20 विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशा या मोठ्या स्पर्धेसाठी जगाभरातील क्रिकेटचे चाहते उत्सुक आहेत. यानंतर भारतात 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळाला जाणार आहे. खरंतर या विश्वचषकावेळी भारतीय संघात काही नवीन आणि युवा चेहरे दिसू शकतात. जे संघाचा भार उचलू शकतील. खासकरून ज्य़ा युवा खेळाडूंनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली, त्यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. तरी असे काही युवा क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने गेल्या काही महिन्यात सर्वांना प्रभावित केले आहे. अशा क्रिकेटपटूंना भारतीय संघ 2023 विश्वचषकाच्या दृष्टीने फिनिशर म्हणून तयार करु शकतात. अशाच 5 खेळाडूंवर नजर टाकू.
1. रियान पराग
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान परागने खूप प्रभावित केले आहेत. रियान पराग आयपीएल स्पर्धेत सतरा वर्षांपेक्षा कमी वय असताना अर्धशतक झळकवणारा पहिला खेळाडू आहे. तसेच त्याने 2017मध्ये दरम्यान रणजी ट्रॉफी स्पर्धेतही उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. या कारणास्तव 2018 च्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याला भारतीय संघात संधी मिळाली होती. तो तळातल्या क्रमांकावर येऊन चांगली फटकेबाजी करु शकतो, तसेच संघाला गरज असेल तेव्हा गोलंदाजीही करु शकतो, त्यामुळे अगामी वनडे विश्वचषकासाठी एक फिनिशर म्हणून त्याच्याकडे लक्ष दिले जाऊ शकते.
2. शाहरुख खान
साल 2021 मध्ये सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा युवा खेळाडू शाहरुख खानला आयपीएल 2021 हंगामात पंजाब किंग्सने संघाने भरपूर पैसे देऊन संघात घेतले आहे. शाहरुखने तमिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच आयपीएलमध्येही त्याने पंजाबसाठी काही उपयुक्त खेळी केल्या. त्यामुळे त्याच्याकडेही भविष्यातील फिनिशर म्हणून पाहिले जाऊ शकते.
3. दीपक हुडा
दीपक हुडाने आयपीएल 2014 पासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तो 2014 च्या 19 वर्षाखालील विश्वचषकमध्ये सहभागी होता. हुडाने 2016-17 च्या दरम्यान रणजीमध्ये द्विशतक देखील झळकावले आहे. 2018 साली निदहास ट्रॉफीसाठी भारतीय संघात हुडाची निवड देखील झाली होती. परंतु दुर्दैवाने त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये सहभागी होता आले नाही. हुडा पहिल्यापासूनच निवडकर्त्यांच्या नजरेत आहे. त्यामुळे तो 2023 च्या विश्वचषकामध्ये एक उत्तम फिनिशर म्हणून भूमिका निभावताना दिसू शकतो.
4. अनुज रावत
उत्तराखंडचा युवा खेळाडू अनुष रावत येणाऱ्या कालावधीत भारतीय संघासाठी उत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज म्हणून भूमिका पार पाडू शकतो. राहुल द्रविडनी जेव्हा याला 19 वर्षाखालील भारतीय संघाचे कर्णधार बनवले तेव्हा त्याचे खूप कौतुक केले होते. त्याला 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून फक्त एकच सामना खेळायला. परंतु त्याला आपला प्रभाव टाकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. प्रथम श्रेणीमध्ये अनुजने 19 सामने खेळून 34.25 च्या सरासरीने 925 धावा बनविल्या. ज्यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला वनडे विश्वचषकसाठी देखील तयार केले जाऊ शकते.
5. चेझियन हरीनिशांत
सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये हरीनिशांत आपल्या खेळामुळे खूप चर्चेत राहिला होता. त्यानी यावर्षी तमिळनाडकडून खेळताना या स्पर्धेमध्ये 41 च्या सरासरीने 240 धावा काढल्या. यानंतर अंतिम सामन्यात तमिळनाडूसाठी 35 महत्त्वाच्या धावा काढल्या. त्याची फलंदाजी खूप प्रभावशाली आहे. त्यामुळे सर्व काही ठीक झाले तर 2023 मधील विश्वचषक सामन्यात हा खेळाडू फिनिशरच्या भूमिकेमध्ये दिसू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ चेंडूनंतर पृथ्वी शॉने ठरवले एका षटकात ६ चौकार मारायचे
शेर कभी बुढ़ा नहीं होता! ३८ वर्षीय हाशिम आमला ‘या’ स्पर्धेत पाडतोय धावांचा पाऊस
इंग्लंड जिंकणार भारताविरुद्धची मालिका, दिग्गजाने केला दावा; दिले ‘हे’ कारण