मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात आक्रमक शैलीत फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आपण पहिले आहेत. मात्र, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ब्रेंडन म्यॅक्यूलम यासारखे फलंदाज कसोटी सामन्यांमध्येही आक्रमक शैलीत फलंदाजी करतात. त्यांनी कसोटीत ठोकलेल्या षटकारांच्या संख्येवरून याची प्रचिती येथे.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, एका वेगवान गोलंदाजाने या दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या दोन संघात गुरुवारी (3 डिसेंबर) पाहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने 10 चेंडूत 11 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत एक षटकार ठोकला. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 73 वा षटकार होता.
ऑस्ट्रेलियाचा संघाचा माजी कर्णधार फलंदाज रिकी पॉन्टिंग यानेही कसोटी क्रिकेटमध्ये 73 षटकार ठोकले आहेत. त्याने 168 कसोटी सामन्यात 73 षटकार ठोकले होते. मात्र, टिम साऊदीने 74 कसोटी सामन्यांमध्ये 73 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत साऊदीने रिकी पॉंटिंगला मागे टाकले आहे.
कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत साऊदी अव्वल 15 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 107 षटकार ठोकले आहेत. दुसर्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर अॅडम गिलक्रिस्ट (100 षटकार) आहे.
कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विरेंद्र सेहवाग (91 षटकार) अव्वल स्थानी आहे. मॅक्यूलम, गिलख्रिस्ट, गेल, कॅलिस, या दिग्गज फलंदाजांनंतर सेहवाग पाचव्या स्थानावर आहे. माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी 78 षटकारांसह 13 व्या स्थानावर आहे.
टिम साऊदीचे लक्ष्य आता बेन स्टोक्स (74 षटकार) आणि एमएस धोनी यांच्या विक्रमावर असेल. धोनीला मागे टाकण्यासाठी साऊदीला केवळ 6 षटकारांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video – केवळ खेळाडूच नाही तर प्रेक्षकांनीही घेतले भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत अफलातून झेल
ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर