नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या ६ बाद ३०७ धावा अशी आहे.
आज भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीची १० वर्षे पूर्ण केली. संथ गतीने सुरूवात करताना तो आदिल रशीदच्या चेंडूवर ९७ धावांवर बाद झाला. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ८१ धावा करत उत्तम साथ दिली.
सलामीवीर शिखर धवन आणि के एल राहूल यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांमध्ये ६० धावांची भागीदारी झाली असता धवन जोस बटलरला झेल देऊन बाद झाला. त्याने ७ चौकाराच्या मदतीने ३५ धावा केल्या. तर राहूलही २३ धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार मारले.
धवन आणि राहूल यांनी केलेली ६० धावांची ही भागीदारी या कसोटी मालिकेतील भारताची सलामीची सर्वोच्च् भागीदारी ठरली.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला चेतेश्वर पुजाराने या ही सामन्यात चाहत्यांची निराशा केली. १४ धावांवर असताना त्याचीही विकेट वोक्सने काढली.
लंचब्रेकपूर्वी वोक्सने पहिल्या तीनही विकेट्स घेत भारतीय तंबूत हाहाकार माजवला होता. पण त्यानंतर भारताची धावसंख्या ८२/३ अशी असताना कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेट्ससाठी त्यात १५९ धावांची भर घातली.
इंग्लंडकडून वोक्सबरोबरच जेम्स अँडरसन स्टुअर्ट ब्रॉड आणि रशीद यांनीही प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.
तसेच हार्दीक पांड्या १८ वर बाद झाला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. दिवसाखेर रिषभ पंत २२ धावांवर नाबाद आहेत. इंग्लंड या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पुढे आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय
–विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…