हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने ३५४ धावांनी आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले आहे. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात दोन गडी बाद करणाऱ्या रवींद्र जडेजाने मोठा विक्रमाला गवसणी घालत दिग्गज भारतीय क्रिकेटपटूची बरोबरी केली आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजाला पहिल्या तीन कसोटी सामन्यांत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. पण तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने मोईन अली आणि हसीब हमीद यांना बाद करत माघारी धाडले होते. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५०० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो कपिल देवनंतर दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. (Ravindra Jadeja becomes second player to score 4500 international runs and 450 wickets)
जडेजाने २७३ आंतरराष्ट्रीय सामन्यात ४५० गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने १० वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याने ३२ च्या सरासरीने ४७१५ धावा केल्या आहेत. भारताकडून पहिल्यांदा हा विक्रम करणाऱ्या माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी ३५६ सामन्यात ६८७ गडी बाद केले आहेत. तर ९ शतकांच्या साहाय्याने ९०३१ धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये घेतले आहेत २२३ बळी
रवींद्र जडेजाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ५५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २२३ गडी बाद केले आहेत. यामध्ये ९ वेळेस त्याने ५ गडी बाद करण्याचा आणि १ वेळेस १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच १६८ वनडे सामन्यात त्याने १८८ गडी बाद केले आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याला ३९ गडी बाद करण्यात यश आले आहे.
गडी बाद करण्यासाठी पाहावी लागली वाट
रवींद्र जडेजाला इंग्लंड दौऱ्यावर ५ डाव उलटून गेल्यानंतर गडी बाद करण्यात यश आले आहे. त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात आणि इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात विकेट मिळवण्यात अपयश आले होते. अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या विकेटचे खाते उघडले.
महत्त्वाच्या बातम्या-
हेडिंग्ले कसोटीत भारताची दुर्गति होण्यास कोहलीचा ‘तो’ निर्णय जबाबदार; माजी क्रिकेटरने टोचले कान
भारतापुढे अजून मोठे लक्ष्य, मग चौथ्या दिवशी काय असेल फलंदाजांची योजना? रोहितने केला खुलासा
स्टंप्स कुठे? चेंडू कुठे? वादग्रस्त अंपायर्स कॉलमुळे रोहित तंबूत, चाहत्यांसह पत्नी रितीकाही संतप्त