इंडियन प्रीमियर लीग २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे आतापर्यंतचे प्रदर्शन जास्त चांगले राहिलेले नाही. त्यामुळे चाहते चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीवर खूप निराश झाले आहेत. अशात बुधवारी (७ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला १० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सोशल मीडियावरील काही असंवेदनशील वापरकर्त्यांनी धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.
अशी गंभीर धमकी दिल्याप्रकरणी रविवारी गुजरात पोलिसांनी एका १६ वर्षाच्या युवकाला ताब्यात घेतले आहे. हा १६ वर्षीय युवक १२ वी चा विद्यार्थी आहे. त्याला गुजरातमधील मुंद्रा येथून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात याप्रकरणी रांचीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रांची पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर त्याला गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी पकडले. कच्छ (पश्चिम) पोलिस अधीक्षक सौरभ सिंग यांनी पुष्टी केली आहे की या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाबद्दल सौरभ सिंग यांनी सांगितले की ‘नामना कपाया गावातील १२ वीचा विद्यार्थी असलेल्या युवकाला धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर घृणास्पद धमकी देण्याच्या संदर्भात चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.’
हा युवक गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा गावाचा रहिवासी आहे. या प्रकरणामध्ये रांची पोलिसांनी गुजरात पोलिसांना त्याच्याबद्दल चौकशी करण्यास सांगितले होते. त्याच्या कबुलीजबाबानंतर त्याला रांची पोलिसांनी ताब्यात दिले जाईल.
याबद्दल सिंग यांनी सांगितले की ‘रांची पोलिसांनी आम्हाला कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा येथील रहिवासी असल्याची माहिती दिल्यानंतर आम्ही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर आम्ही पुष्टी केली आहे की हा मुलगा तोच आहे, ज्याने असे घृणास्पद संदेश पोस्ट केले होते. रांचीमध्ये एफआयआर दाखल झाल्यामुळे त्याला रांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.’
या प्रकरणाबद्दल देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच क्रीडा, सिनेसृष्टी तसेच संपूर्ण देशभरातून आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत होती. तसेच धोनीच्या घराची सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्स संघासह युएईमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
-बेंगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ‘या’ माजी क्रिकेटरचा रायडूवर चढला पारा, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा