---Advertisement---

सरकारी नोकरी असेल तरच कॅमेरात पाहा!! स्टेडियममधील ‘त्या’ सुंदरीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, होतेय ट्रेंड

On: शनिवार, मार्च 13, 2021 12:52 PM
---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे शुक्रवार (१२ मार्च) रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टी२० सामना पार पडला. या सामन्यात ८ विकेट्सने भारताला चितपट करत इंग्लंडने मालिकेची दमदार सुरुवात केली. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कित्येक चाहत्यांनी हजेरी लावली होती. मात्र हजारो लोकांच्या गर्दीत एका मुलीने सर्वांचे लक्ष वेधले. सध्या सामन्यापेक्षा जास्त त्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघाच्या डावावेळी खासकरुन श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते मोठमोठ्याने जल्लोष साजरा करत होते. त्यामुळे चाहत्यांच्या जल्लोषाची झलक टिपण्यासाठी कॅमेरामन त्यांच्यावर कॅमेरा फिरवत होता. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका सुंदर मुलीची कॅमेरामनने छबी टिपली.

त्यानंतर कॅमेरामननेही अधूनमधून तिच्यावर कॅमेरा फोकस केला आणि पाहता पाहता सामना दर्शकांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले. अनेकांनी सोशल मीडियावर तिचे सामना पाहतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्या मुलीच्या बाजूला एक काकूही उभ्या होत्या. त्यामुळे त्यादेखील स्पष्टपणे कॅमेरात दिसत होत्या. यावर अनेकांनी त्या काकू त्या मुलीची आई असाव्यात असे कयास लावत ‘सरकारी नोकरी असेल तरच कॅमेरात पाहा’, अशा विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/SarcasticVibs/status/1370410411988713473?s=20

भारतीय संघाची वाईट सुरुवात

पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंनी निराशादायी प्रदर्शन केले. कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर रोहित शर्माला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारताचे सलामीवीर ५ धावाही करु शकले नाहीत. विराट तर भोपळाही न फोडता माघारी परतला. यष्टीरक्षक रिषभ पंतने काही लक्षणीय फटके मारले. पण तोही २३ चेंडूत २१ धावा करत पव्हेलियनला परतला. अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही अवघ्या १९ धावा केल्या.

श्रेयस अय्यरने एकट्याने एकाकी झुंज दिली आणि ४८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याच्या कामगिरीमुळे भारताने इंग्लंडपुढे १२५ धावांचे लक्ष्य उभारले. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी १५.३ षटकातच २ विकेट्स गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. यासह ८ विकेट्सने सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

1st T20: इंग्लंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, ‘हे’ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक!

INDvENG: खराब कामगिरीमुळे इंग्लिश दिग्गजाने टीम इंडियाची केली थट्टा अन् पडला तोंडघशी

INDvENG: खराब कामगिरीमुळे इंग्लिश दिग्गजाने टीम इंडियाची केली थट्टा अन् पडला तोंडघशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---