एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन काही वर्ष झाली. मात्र चाहत्यांमधील त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. धोनी चाहत्यांना सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. त्याचा एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत धोनी त्याच्या एका चाहत्याच्या टी शर्टवर स्वाक्षरी देताना दिसतो.
एमएस धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मैदानाबाहेर अनेकदा दिसतो. यादरम्यान चाहत्यांशी देखील त्याची अनेकदा भेट होत असते. असे असले तरी, एमएस धोनीला भेटणे आजही असंख्य चाहत्यांसाठी स्वप्नच आहे. अशात जर धोनी अचाणक समोर आला आणि भेटण्याची संधी मिळाली, तर कोणासाठीही हा प्रसंग न विसरण्यासारखाच असेल. धोनी आणि त्याच्या एका चाहत्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओत धोनी या चाहत्याच्या टी शर्टवर स्वाक्षरी देताना दिसत आहे. पांढऱ्या टी-शर्टवर धोनीने स्वाक्षरी दिल्यानंतर हा चाहता देखील खुपच आनंदात दिसला.
एमएस धोनी आयपीएलच्या सर्वोत्तम संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्जाच कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात संघाने एकूण चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामात देखील सीएसकेचे नेतृत्व करणार असून हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. धोनी सध्या 41 वर्षांचा असला आगामी आयपीएल हंगामात तो निवृत्ती घोषित करेलच, याविषयी अद्याप कुठलीही ढोस माहिती मात्र समोर आली नाहीये. आगामी हंगामासाठी सीएसकेमधील काही प्रमुख खेळाडूंना रिलीज केले गेले, यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे ड्वोन ब्रावो आणि रॉबिन उथप्पा यांचा. ब्रावो सध्या संघाच्या सपोस्ट स्टाफचा भाग नबला आहे.
https://twitter.com/TheDhoniEmpire/status/1601962815753158658?s=20&t=bWt6uOX0TSDBjTUzS7LF1A
आयपीएल 2023 पूर्वी सीएसकेने रिटेन केलेले खेळाडू – एमएस धोनी (कर्णधार), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हैंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना , सिमरजीत सिंह, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षणा.
सीएसकेने रिलीज केलेले खेळाडू – ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, एडम मिलने, हरि निशांत, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन.
आयपीएल 2023 पूर्वी बीसीसीआयने 23 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला आहे. या लिलावादरम्यान खेळाडूंवर खर्च करण्यासाठी सीएसकेकडे 20.45 कोटी रुपये बाकी आहेत. (A beautiful video of MS Dhoni and his fan is currently going viral on social media)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
47000 प्रेक्षकांसमोर भारतीय महिला संघाचा व्हिक्टरी लॅप, व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
मराठीत माहिती- क्रिकेटर युवराज सिंग