चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होत आहे. तत्पूर्वी मागील काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला ट्राय सिरीज मध्ये हरवत फायनल सामना जिंकला. तसेच आता मिचेल सैंटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाच्या नजरा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी न्युझीलँड संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन स्पर्धेतून बाहेर पडला आहे.लॉकी फर्ग्यूसनचं चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर होणं न्यूझीलंड संघासाठी मोठा झटका मानला जात आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने लॉकी फर्ग्यूसनच्या जागी दुसऱ्या खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. लॉकी फर्ग्यूसनच्या ठिकाणी काइली जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
लॉकी फर्ग्यूसन त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये न्युझीलँडला सामना खेळताना त्याची कमी भासू शकते.आता हे बघणं उत्सुकतेच असेल की,लॉकी फर्ग्यूसनच्या ठिकाणी काइली जेमिसन कसा खेळतो? काइली जेमिसन त्याच्या उंची मुळे सहज खेळतो पण तो खूप वेळापासून क्रिकेटपासून दूर आहे.
लॉकी फर्ग्यूसनने 65 वनडे सामन्यांत त्याशिवाय 43 टी 20 सामन्यात न्यूझीलंडच प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच लॉकी फर्ग्यूसन किवी संघासाठी 1 कसोटी सामना खेळला आहे. लॉकी फर्ग्यूसनने वनडे फॉरमॅटमध्ये 31.56 च्या सरासरीने आणि 33.33 स्ट्राईक रेटने तसेच 5.68 इकॉनॉमीने 99 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्याचा लॉकी फर्ग्यूसन ची चांगली गोलंदाजी म्हणजे त्याने 45 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लॉकी फर्ग्यूसनने टी 20 फॉरमॅट मध्ये 14.36 स्ट्राईक रेटने आणि 16.98 च्या सरासरीने व 7.1 इकॉनॉमीने 64 फलंदाजांना बाद केले आहे.
हेही वाचा
“आता पाकिस्तानचे आतिथ्य संपूर्ण विश्व अनुभवेल.” रमिझ राजांचे ठळक वक्तव्य !
क्रिकेट चाहत्यांसाठी गिफ्ट! चॅम्पियन्स ट्रॉफीची सर्व माहिती आणि वेळापत्रक एका क्लिकवर!
“रोहित शर्माच्या विनोदबुद्धीचा मास्टरस्ट्रोक, जडेजाच्या प्रश्नावर दिले हटके उत्तर!”






