---Advertisement---

डिफेंडिंग चॅम्पियन RCB या 5 खेळाडूंना करणार रिलीज? लिस्टमध्ये काही आश्चर्यचकित करणाऱ्या नावांचा समावेश!

On: सोमवार, नोव्हेंबर 10, 2025 7:35 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आगामी IPL 2026 हंगामात डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरेल. पण त्याआधी संघ आपल्या स्क्वाडमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलचा मिनी ऑक्शन 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्व 10 फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयला सादर करावी लागणार आहे. आयपीएल 2026 पूर्वी आरसीबी या पाच खेळाडूंना रिलीज करू शकते.

लियाम लिव्हिंगस्टोन

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन (Liyam Livingstone) हा RCBकडून रिलीज होऊ शकणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
RCBने त्याला मागच्या मेगा ऑक्शनमध्ये 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. कर्णधार रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली लिव्हिंगस्टोनने 10 सामने खेळले आणि 8 डावांत फक्त 112 धावा केल्या. त्याची स्ट्राइक रेट 133.33 इतकी होती आणि तो फक्त एक अर्धशतक ठोकू शकला. गोलंदाजीतदेखील त्याने काही विशेष कामगिरी केली नाही.

मयंक अग्रवाल

देवदत्त पडिक्कल जखमी झाल्यानंतर RCBने त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात घेतले होते.
पडिक्कलने जखमी होण्यापूर्वी 10 डावांत 150.60 च्या स्ट्राइक रेटने 247 धावा केल्या होत्या.
तर मयंकने RCBसाठी 4 सामने खेळून 148.43 स्ट्राईक रेटने फक्त 94 धावा केल्या. आता पडिक्कल परत येणार असल्याने, RCB मयंकला रिलीज करून पर्समध्ये जास्त बजेट राखण्याचा विचार करू शकते.

स्वप्निल सिंह

34 वर्षीय स्वप्निल सिंहला RCBने मागील ऑक्शनमध्ये RTM कार्ड वापरून 50 लाख रुपयांत घेतले होते. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे RCB त्याला ऑक्शनपूर्वी रिलीज करू शकते.

लुंगी एनगिडी

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीलाही RCB रिलीज करू शकते. त्याला संघाने 1 कोटी रुपयांत घेतले होते. त्याने 2 सामने खेळून 4 विकेट्स घेतल्या. पण, RCBला त्याला प्लेइंग 11 मध्ये बसवणे अवघड जात होते. त्यामुळे एनगिडीही रिलीज लिस्टमध्ये असू शकतो.

रासिक सलाम दार

जम्मू-काश्मीरचा तरुण वेगवान गोलंदाज रासिक सलाम दारला RCBने 6 कोटी रुपयांत घेतले होते.
त्याने पदार्पणाच्या सामन्यात 3 षटकांत 35 धावा देऊन 1 बळी घेतला. नंतर अजून एक सामना खेळला, पण नंतर तो संघाबाहेरच राहिला. त्यामुळे RCB त्यालाही ऑक्शनपूर्वी रिलीज करण्याचा विचार करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---