---Advertisement---

IPL 2024 पुर्वी गुजरात टायटन्सला झटका, अफगाणिस्तानच्या ‘या’ खेळाडूवर आयपीएलपूर्वी 12 महिन्यांची बंदी

On: बुधवार, फेब्रुवारी 21, 2024 2:08 PM
Gujarat-Titans
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाच्या सुरुवातीची तारीख समोर आली आहे. तसेच यावेळी 10 संघांसह जगातील सर्वात मोठी लीग 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबरोबरच IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे.

याबरोबर, आयपीएलबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चाहते या स्पर्धेची दीर्घकाळ वाट पाहत असतात. शेवटी ती वेळ जवळ आली असून आयपीएल मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा सुरू होण्यासाठी केवळ एक महिना उरला आहे. त्याआधी गुजरात टायटन्सच्या एखा खेळाडूला एका मोठ्या स्पर्धेत 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच हा खेळाडू दुसरा कोणी नसुन अफगाणिस्तानचा नूर अहमद आहे.

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू नूर अहमद ILT20 मध्ये शारजाह वॉरियर्सकडून खेळत असताना त्याने  फ्रँचायझीसोबत केलेल्या कराराच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच तो ILT20 खेळण्याऐवजी तो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या SA20 स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता. या कारणामुळे खेळाडूवर 12 महिन्यांसाठी ILT20 मध्ये बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी नवीन उल हकवर फ्रँचायझीने 20 महिन्यांची बंदी घातली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानचा खेळाडू नूर अहमदवरही सुरुवातीला 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, पण पहिल्या ILT20 हंगामात नूर अहमद अल्पवयीन होता, त्यामुळे त्याची शिक्षा 12 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली होती. या बंदीमुळे खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. आता ILT20 द्वारे नूर अहमदवर काही कडक कारवाई होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---