इंडियन प्रीमियर लीग लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा कुठे होणार ? यासंदर्भात संदिग्धता होती. भारत किंवा दुबईत स्पर्धा घेण्याचा पर्याय समोर ठेवला होता. परंतु या स्पर्धा कुठे होणार यासंदर्भातील माहिती ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबरोबरच बांगलादेश प्रीमियर लीग सुरू असून यामध्ये जगभरातील अनेक महान आणि स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. यामध्ये आंद्रे रसेलने मंगळवारी रात्री बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घातला आहे.
मंगळवारी रात्री बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये कोमिल्ला व्हिक्टोरियन्स आणि रंगपूर रायडर्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात रंगपूरने प्रथम फलंदाजी करताना150 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात कोमिल्ला व्हिक्टोरियन्स संघाने 15 व्या षटकात 103 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यामुळे रंगपूरचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण त्यानंतर रसेलने केवळ 12 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी केली आहे.
यादरम्यान रसेलच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार निघाले होते. तसेच रसेलने मोईन अलीसोबत पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. मात्र, यात अलीचे योगदान 10 चेंडूत केवळ 5 धावांचे होते. तर केवळ 12 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावण्यासोबतच आंद्रे रसेलने या सामन्यात गोलंदाजीतही अद्भुत कामगिरी करत 2.5 षटकांत 20 धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही देण्यात आला आहे.
दरम्यान, आंद्रे रसेल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये रसेलने रसेलने अवघ्या 29 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी केली होती. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 7 षटकारही निघाले होते.
महत्वाच्या बातम्या –
- विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, ‘अकाय’ नावाचा अर्थ काय? घ्या जाणून सविस्तर
- IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं फिक्स गिऱ्हाईक असलेल्या जो रूटला,ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने दिला सल्ला; म्हणाला…