---Advertisement---

विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, ‘अकाय’ नावाचा अर्थ काय? घ्या जाणून सविस्तर

On: बुधवार, फेब्रुवारी 21, 2024 12:35 PM
Virat-Kohli-And-Anushka-Sharma
---Advertisement---

स्टार भारतीय खेळाडू विराट कोहली आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माला लंडनमध्ये पुत्रप्राप्ती झाली आहे. याबाबत अनुष्का आणि विराटने पाच दिवसांनी म्हणजे 20 जानेवारीला सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. याबरोबरच विराट आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नावंही जाहीर केलं आहे. 

याबरोबरच विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. या नावाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अकाय या नावाचा अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो. वामिकाच्या नावाची अशीच चर्चा रंगली होती. वामिकाच्या नावाचाही एक अर्थ आहे. वामिका म्हणजे दुर्गा देवी. दुर्गा देवीच्या दुसऱ्या रुपाला वामिका म्हंटलं जातं. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलांची नावं अर्थपूर्ण ठेवली आहेत.

https://twitter.com/imVkohli/status/1759962813626491369

अशातच विराटने सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हंटले आहे की, आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या घरी 15 फेब्रुवारीला एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. बाळाचं नाव अकाय ठेवलं असून वामिका छोटा भाऊ मिळाला आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठिशी कायम राहू दे. माझी तुम्हाला विनंती आहे की प्रायव्हसीचा मान राखावा.

तसेच विराट-अनुष्का जोडीच हे दुसर अपत्य आहे. तर विराटला पहिली मुलगी असून तिच नाव वामिका आहे. मुलीप्रमाणे विराटने आपल्या मुलाच नावही एकदम हटके ठेवल आहे. विराटने मुलाच नाव अकाय ठेवलय. पण ते ऐकताच क्षणी हे नाव पूर्णपणे वेगळ वाटतं आहे. अनेकजण इंटरनेटवर अकाय या नावाचा अर्थ शोधतायत. अनुष्का आणि कोहलीने आपल्या मुलाच नाव इन्स्टाग्रामवर शेअर केलय तेव्हापासून ट्रेंडमध्ये आहे.

दरम्यान, विराट कोहलीचं नाव पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी जाहीर केलं नव्हतं. त्यानंतर उर्वरित तीन कसोटी सामन्यापासून त्याने दूर राहिला. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते नेमकं काय झालं आहे याबाबत संभ्रमात होते.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---