सध्या आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाच्या सुरुवातीची तारीख समोर आली आहे. यावेळी 10 संघांसह जगातील सर्वात मोठी लीग 22 मार्चपासून सुरू होणार आहे. याबाबत लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
याबरोबरच, लोकसभा निवडणुकांच्या तारखा मार्च माहिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीचा केवळ १५ दिवसांच्या कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित सामन्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने भारतात आयपीएलच्या 12 व्या हंगामाचे यशस्वी आयोजन केले होते. हे लक्षात घेऊन यावेळीही आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने 17वा हंगाम भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आयपीएलला या लीगचे वेळापत्रक सरकारच्या सहकार्याने बनवावे लागणार आहे.
Planning to start IPL from March 22, says league chairman Arun Dhumal @ThakurArunS #IPL2024
— Press Trust of India (@PTI_News) February 20, 2024
लोकसभा निवडणुकांमुळे २००९ मध्ये ‘आयपीएल’चे संपूर्ण सत्र दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पार पडले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांदरम्यान आयपीएल भारतातच झाली होती. यंदाह या स्पर्धा दुबईत होण्याची चर्चा होती. मात्र आयपीएलचा पहिला सामना गतविजेता आणि उपविजेतामध्ये होतो. यामुळे यंदाही पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे.
याबरोबरच आयपीएल 2024 च्या मोसमात 10 संघ विजेतेपदासाठी लढतील. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स. मुंबई आणि चेन्नई या स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे संघ आहेत. दोघांनी 5-5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. चेन्नई गतविजेता आहे. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2023 च्या फायनलमध्ये गुजरातचा पराभव करून पाचवे विजेतेपद पटकावले होते.
दरम्यान, ‘आयपीएल’चा लिलाव मागील वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. त्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर सर्वाधिक म्हणजे २४.७५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेलला खरेदी केले होते.
महत्वाच्या बातम्या –