---Advertisement---

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यातून बुमराह अन् राहुल बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात निवड

On: बुधवार, फेब्रुवारी 21, 2024 9:58 AM
Jasprit Bumrah
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 23 फेब्रुवारीपासून रांची येथे होणाऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल देखील चौथ्या कसोटीचा भाग असणार नाही. असे बीसीसीआयने सांगितले आहे. 

याबरोबरच, बीसीसीआयने सांगितले आहे की, बुमराहच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी बोर्डाने त्याला चौथ्या कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय संघासाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे के. एल. राहुल अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्याने तो चौथ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे.

यामुळे भारतीय संघाचा वा खेळाडू मुकेश कुमार हा संघात परतला आहे. तिसऱ्या सामन्यामधील प्लेइंग 11 मध्ये नसल्याने त्याला रणजी सामना खेळण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र आता जसप्रीत बुमराह याच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग 11 मध्ये खेळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारत आणि  इंग्लंडमधील  पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितसेनेने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. जर चौथा सामनाही टीम इंडियाने जिंकला तर मालिका टीम इंडिया खिशात घालणार आहे. या कसोटी सामन्यात संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

पुढील प्रमाणे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :-

रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---