सनराईजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला सुरत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कारण, मॉडेल तानिया सिंगने वेसू येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले होते. त्यानंतर वेसू पोलिसांनी अभिषेक शर्माला नोटिस पाठवली आहे. तसेच तानिया ही 28 वर्षाची असून ती मुळची राजस्थानची होती. ती सध्या वेसू येथे हॅप्पी एलिगन्समध्ये राहत होती.
याबरोबरच, सुरत पोलिसांनी अभिषेक शर्माला नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना तानियाचा आयपीएल खेळाडू अभिषेक शर्माशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. मात्र, काही काळ अभिषेक आणि तानिया यांच्यात संपर्क होत नव्हता. परंतु पोलिसांनी अभिषेकला त्याच्या आणि तानियाच्या मैत्रीबाबत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना वेसू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.यू.बरड म्हणाले आहेत की, कॉल डिटेल्सनुसार तानिया आणि अभिषेक शर्मा यांच्यात कोणताही संपर्क झालेला नाही. मात्र, त्यांच्या मैत्रीमुळे अभिषेकला चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.’ तानिया सिंगच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण सुरत शहरात एकच खळबळ उडाली आहे. तानियाने आपले आयुष्य असं अचानक संपवण्यामागं प्रेम संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी तानियाचे फोन रेकॉर्ड्स तपासण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, अभिषेक शर्मा हा आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळत असतो. तसेच त्याने आतापर्यंत 47 सामन्यात 137.38 च्या स्ट्राईक रेटने 893 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 9 विकेट्स देखील घेतल्या आहेत. याबरोबरच, अभिषेक शर्मा हा पंजाबकडून रणजी ट्रॉफी खेळतो. त्याने 2023 – 24 च्या हंगामात चार सामने खेळले आहेत. त्यात त्याने 199 धावा केल्या असून तीन विकेट्स देखील घेतल्या आहेत. आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात 22 मार्चपासून होत आहे. हैदराबाद गेल्या तीन हंगामापासून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता.
महत्वाच्या बातम्या –






