सध्या झिम्बाब्वेमध्ये आयसीसी वनडे विश्वचषकासाठी क्वॉलिफायर सामने खेळले जात आहेत. शुक्रवारी (24 जून) स्कॉटलँड विरुद्ध यूएई असा सामना खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलँडने यूएई संघाला 111 धावांनी पराभूत केले. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत गोलंदाज चेंडू टाकण्याआधी चेंडूची स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे.
स्कॉटलँडचा फिरकी गोलंदाज मार्क वॉट (Mark Watt) याने हा चेंडू टाकण्याआधी स्वतःच्या खिशातून एक कागद काडला, ज्यावर काहीतरी लिहिले होते. या कागदावर लिहिलेली स्क्रिप्ट वाचल्यानंतर गोलंदाज पुढचा चेंडू टाकतो. चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गोलंदाज स्क्रिप्ट वाचत आहेत.”
https://www.instagram.com/reel/Ct1Sv2AP9RS/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MTI1ZDU5ODQ3Yw==
मार्क वॅटने या सामन्यात एकूण 8 षटके गोलंदाजी केली आणि 22 धावा खर्च करून एक विकेट देखील घेतली. त्याने युएईचा सलामीवीर मोहम्मद वसीम याला 36 धावांवर बाद केले.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी स्कॉटलँडने 8 बाद 282 धावा केल्या होत्या. प्रत्युत्रतात यूएई संघ 35.3 षटकांमध्ये 171 धावा करून सर्वबाद झाला. स्कॉटलँडचा कर्णधार रिची बेरिंग्टन याने सर्वाधिक 127 धावांची खेळी केली होती. शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्क वॅट याने 44 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यूएईसाठी सलामीवीर मोहम्मद वसीम यानेच सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्यांचा दुसरा एकही फलंदाज 30 धावांपेक्षा मोठी खेळी केली नाही. (A bowler reads a script before bowling in a 2023 World Cup qualifier match)
महत्वाच्या बातम्या –
यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा
तेव्हापासून क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळू लागली, बरोबर 85 वर्षांपूर्वी खेळला गेलेला ऐतिहासिक सामना