बांगलादेश विरुद्ध भारत (BANvsIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो निर्णय त्यांचा पूर्णपणे चुकल्याचे दिसले, कारण त्यांचा पहिलाच डाव 227 धावसंख्येवर उरकला. दुसऱ्या डावातही त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या दिवशी संपूर्ण संघ अवघ्या 231धावांवर गारद झाला. यामुळे भारतासमोर आता विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य आहे.
शेर ए बांगला स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावात भारताच्या उमेश यादव, आर अश्विन आणि जयदेव उनाडकट यांनी यजमानांना सळो की पळो केले होते. उमेश आणि अश्विन या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. 12 वर्षानंतर कसोटी संघपुनरागमन करणाऱ्या उनाडकटने देखील निराशा नाही केली. त्याने 2 विकेट्स घेतल्या. या डावात बांगलादेशकडून मोमिनुल हक याने सर्वाधिक अशा 84 धावा केल्या.
भारताच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळतच झाली. यावेळी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्या उल्लेखनीय भागीदारीमुळे संघाने तीनशेचा आकडा गाठला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. हे दोघे होते म्हणून भारताचे निभावले कारण संघाच्या पहिल्या चारही विकेट 94 धावसंख्येवरच पडल्या होत्या. यावेळी पंतने टी20 प्रमाणे फलंदाजी केल. त्याने अय्यरच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला. पंत 105 चेंडूत 93 धावा करत बाद झाला. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार मारले.
अय्यरही 105 चेंडूत 87 धावा करत परतला. त्याने 10 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने या धावा केल्या. यावेळी पंत आणि अय्यरचा स्ट्राईक रेट 80च्या पुढे राहिला. भारताच्या पहिल्या डावात या दोघांव्यतिरिक्त एकही खेळाडू 30 धावांच्या पुढे गेला नाही. या डावात बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भारताने पहिल्या डावात 314 धावसंख्या उभारताना 87 धावांची आघाडी घेतली होती.
Innings Break: India have bowled out Bangladesh for 231 in 70.2 overs. We need 145 runs to win the 2nd Test.
https://t.co/CrrjGfXPgL #BANvIND pic.twitter.com/zoO7niYXpF
— BCCI (@BCCI) December 24, 2022
बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही भारताच्या गोलंदाजीची धार दिसली. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि पुन्हा एकदा अश्विन यांनी यजमानांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. अक्षरने सर्वाधिक अशा 3 तर सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. यावेळी लिटन दास हा धोक्याचा दिसत असताना सिराजने त्याला त्रिफळाचीत केले. दास 73 धावा करत तंबूत परतला.
या मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांनी जिंकला आहे. यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम
‘स्टोक्सला जरा कमीच मिळाले’, आयपीएल 2023च्या लिलावात तब्बल 16 कोटी मिळूनही ‘हा’ दिग्गज नाही समाधानी