---Advertisement---

रोहित शर्माला 3 ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी, 15 महिन्यांत करू शकतो मोठा पराक्रम

Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघाला आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत ट्रॉफी मिळवता आली नाही. तसेच 2023 मध्ये भारतीय संघाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी होती. तर या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच चांगली होती पण फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि रोहित  शर्माच्या हातून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधीही गेली होती. मात्र आता रोहित शर्माला 15 महिन्यांत तीन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी सध्या निर्माण झाली आहे.

याबरोबरच एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील पराभव विसरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता पुढे सरकत आहे. तसेच भारतीय संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने  आधीच आपले नाव कोरले आहे. मात्र आता मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका 4-1 ने जिंकायची चांगली संधी आहे.

तसेच भारतीय संघ 2024 मध्ये ICC T20 विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. तर या स्पर्धेला 1 जूनपासून अमेरिकेत सुरवात होणार आहे. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवायची संधी आहे. यानंतर भारतीय संघाच्या नजरा 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर असतील. ज्यांचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. मात्र आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते. कारण भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. यापूर्वी आशिया कप 2023 मध्येही असेच चित्र पाहायला मिळाले होते.

दरम्यान, T20 विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची नजर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलवर असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत भारतीय संघ वेगाने पुढे जात आहे. तसेच मागील दोन वेळा भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघ जुन्या चुका सुधारून विजेतेपदावर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---