भारतीय संघ सध्याच्या घडीला तिन्ही फॉर्मेटमध्ये आघाडीवर आहे. तसेच जागतिक क्रिकेटवर भारतीय संघ राज्य करत आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला तर न्यूझीलंडला संघाला दुसरा मोठा धक्का बसला. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
याबरोबरच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एक स्थान गमावले आहे. या पराभवानंतर किवी संघ दुसऱ्या स्थानावर घसरला. या पराभवामुळे न्यूझीलंडचे 60 टक्के गुण कमी झाले आहेत. भारतीय संघाचे 64.58 गुण आहेत. मात्र विजयानंतरही ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. संघाला 59.09 टक्के गुण आहेत.
आयसीसी रँकिंगमध्ये भारताचाच दबदबा –
भारतीय संघ कसोटीत नंबर 1
वनडे मध्ये भारतीय संघ नंबर 1
टी 20 मध्ये नंबर 1 भारतीय संघ
Number 1 Test team – India (Joint)
Number 1 ODI team – India
Number 1 T20I team – India
Number 1 rank in WTC – IndiaDomination by the Indian team. 🇮🇳 pic.twitter.com/pC6PC6CH1m
— Johns. (@CricCrazyJohns) March 3, 2024
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे. तसेच हा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. भारतीय संघाने रांचीतील चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघ या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिका एकतर्फी फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- WTC Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा, रोहितची सेना बनली टेबल टॉपर
- IND Vs ENG : पाचव्या कसोटीत रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, ‘या’ दोन खेळाडूंना करणार संघातून बाहेर