भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे. तसेच हा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. भारतीय संघाने रांचीतील चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघ या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिका एकतर्फी फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
याबरोबरच भारताने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकून मालिका जिंकली आहे. भारताला मालिकेतील पहिल्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर रोहितच्या सेनेने जबरदस्त पुनरागमन करत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. पण सर्व काही ठीक चालले असताना रोहित शर्मा धर्मशाला कसोटीपूर्वी मोठा निर्णय घेत पुढच्या कसोटीतून कर्णधार दोन खेळाडूंना संघाबाहेर करणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याबाबत भारतीय संघावर जास्त दडपण असणार नाही, कारण भारतीय संघाने कसोटी मालिका आधीच जिंकली आहे. पण गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडची स्थितीही खूपच खराब झाली आहे, अशा परिस्थितीत इंग्लंडही हा सामना जिंकण्यासाठी सगळी ताकद लावताना पहायला मिळेल.
अशातच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता जसप्रीत बुमराह धर्मशाला कसोटीत पुनरागमन करणार आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या आगमनाने एका खेळाडूला संघातून बाहेर बसावे लागू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत बुमराहच्या पुनरागमनानंतर मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा वगळले जाण्याची शक्यता आहे. कारण आकाश दीप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने चौथ्या कसोटी सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे आकाशला वगळले जाण्याची शक्यता फार कमी आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia's squad for the 5th @IDFCFIRSTBank Test against England in Dharamsala announced.
Details 🔽 #INDvENG https://t.co/SO0RXjS2dK
— BCCI (@BCCI) February 29, 2024
दरम्यान, भारताचा युवा खेळाडू रजत पाटीदारला सलग 3 कसोटी सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती, पण तो खेळाडू काही अप्रतिम दाखवू शकला नाही. तसेच त्याने 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावात केवळ 63 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत रजत पाटीदार धर्मशाला कसोटीतून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Video : बापरे..! भारतीय क्रिकेटपट्टू युझवेंद्र चहलला संगीता फोगटने उचलले डोक्यावर, अन् मग झालं असं काही
- WPL 2024 : आरसीबीवर मुंबई इंडियन्स पुन्हा पडली भारी, मिळवला 7 गडी राखून विजय