---Advertisement---

पाकिस्तानची जगभरात नाचक्की! आयपीएलसाठी स्टार खेळाडूने पीएसएलला मारली लाथ; पीसीबी संतापले

On: शनिवार, मार्च 14, 2026 10:22 PM
---Advertisement---

IPL 2026 सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे हर्षित राणा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीने केकेआर संघात प्रवेश केला आहे. मुजरबानीच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) प्रचंड संतापले आहे, कारण आयपीएलचे कंत्राट मिळाल्यामुळे झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाने पीएसएल (PSL) सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

​विशेष म्हणजे, ब्लेसिंग मुजरबानीने कोलकाता नाईट रायडर्स संघात मुस्तफिजुर रहमानची जागा घेतली आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनंतर केकेआरने रहमानला संघातून मुक्त केले होते. आता पाकिस्तानी चॅनेल ‘जिओ सुपर’च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इतके संतापले आहे की ते ब्लेसिंग मुजरबानीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

​पीएसएलचा नवीन हंगाम २६ मार्चपासून सुरू होत असून ब्लेसिंग मुजरबानी इस्लामाबाद युनायटेडकडून खेळणार होता. युनायटेडच्या संघाने शमार जोसेफचा बदली खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश केला होता. यासाठी त्याला १.१ कोटी पाकिस्तानी रुपयांचा करार मिळाला होता, परंतु आता त्याने हा करार मोडून कोलकाता नाईट रायडर्सशी हातमिळवणी केली आहे. याच कारणामुळे पीसीबी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे.

​दुसरीकडे, हर्षित राणा दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला असला, तरी केकेआरने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

​ब्लेसिंग मुजरबानीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेसाठी दमदार कामगिरी केली होती. त्याने संपूर्ण स्पर्धेत १३ बळी घेतले आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. झिम्बाब्वेला वर्ल्ड कपच्या ‘सुपर-८’ फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा होता, मात्र झिम्बाब्वेचा संघ उपांत्य फेरीपर्यंत (सेमीफायनल) पोहोचू शकला नव्हता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---