---Advertisement---

Video : बापरे..! भारतीय क्रिकेटपट्टू युझवेंद्र चहलला संगीता फोगटने उचलले डोक्यावर, अन् मग झालं असं काही

On: रविवार, मार्च 3, 2024 10:14 AM
Yuzvendra Chahal
---Advertisement---

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघाबाहेर आहे. तसेच युझवेंद्र चहलला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र त्याच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगट लेग स्पिनर युजवेंद्र चहलच्या खांद्यावर लटकत गोल गोल फिरवत आहे.

याबरोबरच हा संपूर्ण प्रकार ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये घडला आहे. तसेच  युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या डान्स रिॲलिटी शोमध्ये युझवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्माला खूप सपोर्ट केला आहे. युझवेंद्र चहलनेही अनेकवेळा चाहत्यांना पत्नी धनश्री वर्माला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगट ‘झलक दिखला जा’च्या सेटवर मस्तीच्या मूडमध्ये पहायला मिळाली आहे.

तसेच ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोच्या पार्टीदरम्यान, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगटने टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला खांद्यावर उचलून तीच्या भोवती फिरवले आहे. तसेचभारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगटने युझवेंद्र चहलला अशा प्रकारे फिरवले की त्याला चक्कर येऊ लागली. यानंतर युजवेंद्र चहलने हसत संगीता फोगटला थांबण्याचा इशारा देखील करत आहे.

यानंतर चहल आणि संगीताच्या व्हिडीओवर सोशल मीडियाचे चाहते खूप मस्ती करत आहेत. तसेच ‘हरिदय सिंह’ नावाच्या सोशल मीडिया यूजरने चहलच्या या व्हिडिओवर म्हटले आहे की, सध्या त्याच्यासोबत असेच घडत आहे. त्यानंतर ‘ट्रोल पाकिस्तान क्रिकेट’ नावाच्या युजरने लिहिले आहे की, चहल खूप वाईट दिवसांतून जात आहे. ‘हिट’ नावाच्या युजरने लिहिले की संगीता फोगट आपला राग चहलवर काढत आहे कारण गोलंदाज संगीताला मत देऊ शकला नाही.

दरम्यान, युजवेंद्र चहल सध्या आयपीएलच्या तयारीत व्यस्त असून तो राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळत असतो. यापूर्वी हा खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. याबरोबरच आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे. तर स्पर्धेतील पहिला सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---