आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. तर काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी जाहिराती मिळाल्या असून त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. तर या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आता या सामन्याला तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना फ्रँचायझीने चेन्नईत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
याबरोबरच या शिबिरात चेन्नई सुपर किग्जचे काही खेळाडू शुक्रवारीच पोहोचले होते. तर पीटीआयच्या इनपुटनुसार, एमएस धोनी कधी येणार याबद्दल कोणती सुद्धा माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच शुक्रवारी धोनी पत्नी साक्षीसोबत जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित होते. तर या शिबिरात शनिवारी स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर दिसला होता.
याबाबत तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली आहे की, भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी शुक्रवारी शिबिरात पोहोचली होती. तर येत्या काही दिवसांत आणखी काही खेळाडूही या शिबिरात लवकरच दाखल होणार आहेत. सध्या या शिबिरात मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, प्रशांत सोळंकी, अजय मंडल आणि दीपक चहर शुक्रवारी सहभागी झाले होते. तसेच या शिबिरात सर्वांच्या नजरा दीपक चहरवर असणार आहेत. कारण तो सतत दुखापतीचा सामना करत असतो.
Stars touch down at Kings Arena last night! Stay tuned for the next 🦁 entry this super weekend! 🥳🔥#DenComing pic.twitter.com/oIxjYB7xcX
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2024
याआधी डिसेंबरमध्ये, ऑस्ट्रेलिया मालिकेच्या मध्यभागी, वडिलांच्या प्रकृतीमुळे त्याला अचानक मायदेशी परतावे लागले होते. त्यानंतर तो पुन्हा जखमी झाला होता. तसेच गेल्या महिन्यात बेंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) त्याला तंदुरुस्त घोषित केले होते. त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष हे आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करण्यावर असणार आहे.
Leo Waiting! When Dencoming? 🦁💛 pic.twitter.com/tWA6daqiHn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2024
दरम्यान, एमएस धोनीने गेल्या वर्षी चेन्नईच्या नेतृत्वाखाली पाचवे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे सीएसके नंतर मुंबई इंडियन्ससह सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकणारी फ्रेंचायझी बनली होती. आता यावेळीही चाहते धोनीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच पीटीआयने सांगितले आहे की एमएस धोनी या शिबिरात कधी सामील होणार याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे माही कॅम्पमध्ये कधी दाखल होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र 22 मार्च रोजी होणारा सलामीचा सामना तो नक्कीच खेळणार असल्याचे सांगितले जात आहे.
THALA. 🦁
CHENNAI. 🏟️
YELLOVE. 💛
The Forever Emotion is back! 🥳
🗓️ : March 22, 2024 #SummerOf24 pic.twitter.com/7GlIKO1MRm— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 22, 2024
पहिल्या हाफमधील चेन्नई सुपर किंग्जचे सामने पुढीलप्रमाणे-
22 मार्च- सीएसके विरुद्ध आरसीबी, बंगळुरू
26 मार्च- CSK विरुद्ध गुजरात टायटन्स, चेपॉक (चेन्नई)
31 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध CSK, विशाखापट्टणम
5 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध CSK, हैदराबाद
महत्वाच्या बातम्या –
- ग्लेन फिलिप्सचा पंजा..! पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर 369 धावांचे लक्ष
- मोठी बातमी! ऋषभ पंत ‘या’ दिवशी परतणार मैदानात, तारीख आली समोर…