न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येते होत आहे. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावर मजबुत पकड बनवली आहे. त्याआधी या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सौदीचा हा निर्णय स्टार खेळाडू मॅट हेन्रीने अतिशय योग्य ठरविला होता. तर त्याने स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांसारख्या दिग्गजांसह 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. पण ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरॉन ग्रीन हा पहिल्या ठावात ऑस्ट्रेलियाचा तारणहार ठरला आहे.
याबरोबरच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेत चुरशीची स्पर्धा पहायला मिळत आहे. तसेच या सामन्यात न्यूझीलंडचा क्रिकेटर ग्लेन फिलिप्सची खूप चर्चा होत आहे. तर त्याने या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना 5 विकेट्स घेतल्या आहेत.
अशातच 6 वर्षात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या फिरकीपटूने आपल्याच भूमीवर कसोटी डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात ग्लेन फिलिप्सने उस्मान ख्वाजा (28), कॅमेरॉन ग्रीन (34), ट्रॅव्हिस हेड (29), मिचेल मार्श (0) आणि ॲलेक्स कॅरी (3) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. ग्लेन फिलिप्सच्या आधी जितन पटेलने 2008 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या नेपियर कसोटीत 110 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. ग्लेन फिलिप्सने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एका डावात 5 विकेट घेण्याचा चमत्कार केला आहे.
GLENN PHILLIPS BECOMES THE FIRST NEW ZEALAND SPINNER IN 16 YEARS TO TAKE A FIFER IN A HOME TEST…!!! 🤯🎯pic.twitter.com/i3VJhlFYAl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 2, 2024
ग्लेन फिलिप्सने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांत आटोक्यात आला आहे. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दबदबा पहायला मिळत आहे. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 383 धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 179 धावांमध्येच गुंडाळला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावाच्या जोरावर 204 धावांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सपुढे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 164 धावांवर संपूर्ण बाद झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात विजयासाठी 369 धावांचे लक्ष मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी! ऋषभ पंत ‘या’ दिवशी परतणार मैदानात, तारीख आली समोर…
- राजकारणातून तडफातडफी निवृत्ती घेतलेल्या गौतम गंभीरशी संबंधित अशा 5 गोष्टी, ज्या फार कमी लोकांना माहित आहेत