यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकाची सुरुवात येत्या 2 जूनपासून होणार आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षकांची गरज आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. येणाऱ्या काही दिवसात या निर्णयाची घोषणा होेईल. तत्पूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक कोण होणार? याकडे सर्वाचे लक्ष्य वेधलं आहे. खूप मोठ्या दिग्गज खेळांडूंची नावं चर्चेत आहेत. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यांच नाव प्रशिक्षक म्हणून समोर येत आहे. वॉन यांनी स्वत: सोशल मीडियावर भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा वर्तवली आहे.
तत्पूर्वी बीसीसीआयने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाॅटिंगशी संपर्क साधला होता. परंतु त्यांनी प्रशिक्षकाची ऑफर धुडकावून लावली. गंभीर यावेळी आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्सचा मेन्टाॅर आहे. परंतु आशा ठेवल्या जात आहेत की, फायनल नंतर यावरती गौतम गंभीर विचार करुन निर्णय घेईल.
क्रिकबझ वेबसाईटने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ वर प्रशिक्षक राहुल द्रविड, मुख्य सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा फोटो अपलोड केला आहे. त्यांनी त्यावरती लिहलं की, तुम्ही भारताचा भविष्यातील प्रशिक्षक म्हणून कोणाला बघाल? त्यावर मायकल वाॅन (Michael Vaughan) यांनी रिट्वीट करत लिहलं की, ‘ME..म्हणजे मी.’ त्यानंतर सोशल मीडीयावर खूप कमेंट्स वाढल्या आहेत.
मायकल वॉनच्या या ट्वीटवरती एका यूजरने लिहलं, का नाही. ‘एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि शानदार कर्णधाराला आणा. रेकाॅर्ड बोलतात. 2005 ची एशेज मालिका अजूनही लक्ष्यात आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहलं, ‘स्वत:वरचा विश्वास.’ पाकिस्तान पत्रकाराने मायकल वॉनला ट्रोल केलं. पाकिस्तान पत्रकार फरीद खाननं लिहलं, ‘मायकल, त्यांना एक असा प्रशिक्षक पाहिजे. ज्यानं एकदिवसीय सामन्यात कमीत कमी एक शतक झळकावलेलं असावं.’
बीसीसीआयने प्रशिक्षकांसाठी निवेदन जारी केलं आहे. तत्पूर्वी त्यांनी पगाराच्या बाबतीत काही सांगितल नाही. परंतु राहुल द्रविड भारताचे प्रशिक्षक असताना बीसीसीआय त्यांना वर्षाचे 10 करोड रुपये देत होते. म्हणजे त्यांना महिन्याला 8.34 लाख रुपये मिळत होते. मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआय याआधी रवि शास्त्रींना वर्षाला 9.50 करोड रुपये पगार देत होतं.
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलचं करिअर धोक्यात? भारतीय संघाची काळी बाजू केली उघड…बीसीसीआय ॲक्शन घेणार का?
आयपीएल 2025च्या हंगामात महेंद्र सिंह धोनी चेन्नईकडून खेळताना दिसणार का?
आयपीएल 2025च्या हंगामात महेंद्र सिंह धोनी चेन्नईकडून खेळताना दिसणार का?