आयपीएल 2024 शेवटच्या टप्प्यात आले आहे. या हंगामातला फायनल सामना रविवारी (26 मे) रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्जचा संघ फायनल खेळताना दिसणार नाही. कारण शेवटच्या सामन्यात त्यांचा राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 27 धावांनी पराभव केला. त्यामुळे चेन्नईचा संघ आयपीएल 2024च्या प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर बडला. परंतु एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचादेखील 4 विकेट्सने पराभव झाला.
तत्पूर्वी चेन्नई या हंगामातून बाहेर पडल्यानंतर महेंद्र सिंह धोनी आयपीएल 2025चा हंगाम खेळणार का? यांसारख्या चर्चांना उधाण आलं आहे.धोनीचे फॅन्स नेहमी या गोष्टीवरुन चर्चा करत आहेत. त्यांना पुढच्या हंगामात धोनीचा ‘हेलिकाॅप्टर शाॅट’ पहायला मिळणार की नाही? चेन्नई सुपर किंग्जने युट्यूब चॅनेलवर त्यांचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे धोनीचे फॅन्सदेखील या गोष्टीकडे आकर्षित झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, “निवृत्तीचा निर्णय फक्त धोनीच घेऊ शकतो. आम्ही धोनीच्या निर्णयाचा आदर करतो. आम्हाला आशा आहे की, धोनी लवकरच निर्णय घेईल. आम्हाला खूप जास्त आशा आहे की, धोनी पुढच्या हंगामात चेन्नईसाठी खेळेल. ही सर्व फॅन्सची इच्छा आहे. माझी सुद्धा” यादरम्यान चेन्नईचे सर्व फॅन्स आनंदी झाले आहेत.
आयपीएल 2024 मध्ये एम. एस. धोनी दुखापतीमुळे मोठी खेळी खेळण्यासाठी मैदानावर उतरु शकला नाही. शेवटचे 12 किंवा 10 चेंडू शिल्लक असताना धोनी मैदानावर उतरायचा. परंतु या लहान खेळीन तो संघात उर्जा निर्माण करत होता. धोनी त्याच्या खेळीत षटकार आणि चौकारांवर जास्त भर देत होता. आयपीएल 2024 मध्ये त्यानं 14 सामन्यांमध्ये 220च्या स्ट्राईक रेटनं 161 धावा बनवल्या आहेत. ज्यामध्ये 14 चोकार आणि 13 षटकारांचा समावेश आहे.
धोनीनं या हंगामात कर्णधार पद सोडलं. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्यावरती होती. ऋतुराजनं या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. परंतु चेन्नईचा संघ क्वालिफाय करु शकला नाही. चेन्नईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावरती राहिला.
महत्वाच्या बातम्या-
फायनलसाठी कोणाला मिळणार तिकीट राजस्थान की हेदराबाद?
भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट 16 लाख रुपये, तर सर्वात स्वस्त सुमारे 25 हजार रुपये…
IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबी ‘या’ खेळाडूंना ठेवू शकते संघात कायम…