आगामी टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्क येथे सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची आतुरता आता जगभरातील क्रिकेट प्रेमींना लागली आहे. आणि या मोठ्या सामन्याचं तिकिट मिळणं मात्र कठीण होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट सुमारे 16 लाख रुपयांना विकले जात असल्याचा दावा केला जात आहे. माजी आयपीएल हेड ललित मोदी यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं आयसीसीला फटकारलं आहे.
ललित मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिले की, हे जाणून आश्चर्य वाटले आयसीसी भारत आणि पाकिस्तान सामन्याचं तिकीट 20 हजार डॉलरमध्ये विकत आहे. क्रिकेटची आणखी प्रगती व्हावी आणि चाहते पाहण्यासाठी येऊ शकतील, यासाठी अमेरिकेत विश्वचषक आयोजित केला जात आहे. त्याद्वारे पैसे कमवावे म्हणून नव्हे.
जर आपण आयसीसीची अधिकृत वेबसाईट तपासली तर इथे काहीतरी वेगळेच दिसते. आयसीसीच्या वेबसाईटवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं तिकीट $300 पासून सुरू होते. म्हणजेच भारत-पाकिस्तान सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट सुमारे 25 हजार रुपये आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे सर्वात महागडे तिकीट 10 हजार डॉलर्स असल्याचं समजतं. हे डायमंड क्लबचे तिकीट असेल. भारताच्या दृष्टीने बघितले तर या तिकिटाची किंमत 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. पण 20 हजार डॉलर किमतीचे तिकीट आयसीसीच्या वेबसाइटवर दिसत नाहीत.
भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या टी20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अद्दाप त्यांच्या टी20 विश्वचषकाच्या संघाची घोषणा केली नाही.
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या मुख्य प्रशिक्षकांची प्रतिक्रिया म्हणाले, “या सामन्यात जे काही…”
IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबी ‘या’ खेळाडूंना ठेवू शकते संघात कायम…
अंबाती रायडूचं आरसीबीवर वादग्रस्त विधान म्हणाला, “आक्रमक सेलिब्रेशन करून ट्राॅफी…”