---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सर्वसमावेशक विजय! हाय स्कोरिंग सामन्यात पाकिस्तानला नमवलं, गुणतालिकेत खळबळ

On: शुक्रवार, ऑक्टोबर 20, 2023 10:19 PM
Pat Cummins
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ शनिवारी (20 ऑक्टोबर) चौथ्या क्रमांकावर पोहोचला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना शनिवारी बेंगलोरमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने 62 धावा राखून विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर आपल्या वादळी खेळीमुळे सामनावीर खेळाडू ठरला. त्याचसोबत गोलंदाजांचेही या विजयात महत्वाचे योगदान राहिले. 

उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक पाकिस्तानने जिंकली होती आणि प्रथम फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केले गेले होते. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 367 धावा केल्या. यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 124 चेंडूत 163 धावा केल्या. तर त्याच्या साथीने डावाची सुरुवात करायला आलेल्या मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावा केल्या. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी झाली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुढच्या 8 विकेट्स झटपट गमावल्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 368 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र, त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. सलामीवीर उब्दुल्लाह शफीक आणि इमाम उल हक यांनी अनुक्रमे 64 आणि 70 धावांची खेळी केली. त्यानंतर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यानेही 46 धावांचे योगदान दिले. रिझवान खेळपट्टीवर असेपर्यंत पाकिस्तानच्या विजयाच्या आशा काय होत्या. मात्र, 41व्या षटकात त्यानेही विकेट गमावली. संघासाठी हा सहावा झटका होता. उब्दुल्लाह शफीक, इमाम आणि रिझवानव्यतिरिक्त एकही पाकिस्तानी फलंदाज संघासाठी मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार बाबर अवघ्या 18 धावांवर बाद झाला.

गोलंदाजी विभागातून ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात मोठा वाटा ऍडम झॅम्पा याचा राहिला. झॅम्पाने 10 षटकांमध्ये 53 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. मार्कस स्टॉयनिस आणि पॅट कमिन्स यायंनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. त्याआधी पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही कमाल दाखवली. शाहीन शाह आफ्रिदी याने 10 षटकांमध्ये 54 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. त्याचसोबत हॅरीस रौफ याने 3, तर उसामा मीर यानेही 1 विकेट घेतली. (A comprehensive victory for Australia as they defeated Pakistan by 62 runs in Bengaluru.)

विश्वचषकातील 18व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड

पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ

बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या – 

गिल-श्रेयस यांच्याबद्दल माजी खेळाडूची तिखट प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याच्यात एक मोठी…’
विश्वचकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका भिडणार, जाणून घ्या खास आकडेवारी आणि पिच रिपोर्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---