पुढील महिन्यात 19 तारखेला आयपीएल 2020 साठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी सर्व संघांनी त्यांचे मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनला मुक्त केले आहे. त्यामुऴे 2020 च्या आयपीएल लिलावात स्टेनचाही समावेश असणार आहे.
हा लिलाव होण्याआधी एका चाहत्याने स्टेनला ट्विटरवर प्रश्न विचारला की ‘डेल, प्रामाणिकपणे सांग, तूला आयपीएल 2020 मध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल?’
Dale, honestly which team do you want to play for in IPL 2020?
— Drishti (@drishti_raina3) November 16, 2019
या प्रश्नानंतर अनेकांना स्टेन कोणत्यातरी संघाचे नाव घेईल असे वाटले होते. मात्र स्टेनने उत्तर दिले की ‘ज्याला मी परवडेल (त्या संघाकडून)’.
Whoever can afford me ????
— Dale Steyn (@DaleSteyn62) November 16, 2019
स्टेन 2019 आयपीएलमध्ये बेंगलोर संघाकडून खेळला होता. मात्र त्याला दुखापतीमुळे अर्ध्यातच आयपीएलचा हा मोसम सोडावा लागला. तसेच त्यानंतरही त्याची दुखापत कायम राहिल्याने त्याला 2019 विश्वचषकातूनही एकही सामना न खेळता बाहेर पडावे लागले.
स्टेनने काही दिवसांपूर्वी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष्य केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
गौतमचा धोनीवर 'गंभीर' आरोप; यामुळे २०११ विश्वचषक फायनलमध्ये हुलके शतक https://t.co/QfvjZOPTXD#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #MSDhoni #GautamGambhir #Worldcup2011
— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019
या कारणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दिग्गज खेळाडूला सुनावली मोठी शिक्षा
वाचा????https://t.co/exmnOYud6w????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019






