---Advertisement---

VIDEO; सुरक्षेचा घेरा तोडून विराटला भेटण्यासाठी थेट मैदानातच धावत सुटला चाहता

On: शुक्रवार, डिसेंबर 27, 2024 11:55 AM
---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जात आहे. त्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जात आहे. तत्पूर्वी भारताचा दिग्गज फलंदाज ‘विराट कोहली’चे (Virat Kohli) जगभरात चाहते आहेत. विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान मेलबर्नच्या मैदानावर कोहलीचा एक चाहता सुरक्षेचा घेरा तोडून त्याच्यापर्यंत पोहोचला. चाहत्याने कोहलीच्या खांद्यावर हात ठेवला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लवकरच त्याला मैदानातून बाहेर काढले.

‘विराट कोहली’चे (Virat Kohli) चाहते मैदानावर त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, त्यामुळे सुरक्षेवरही प्रश्न निर्माण होतात. मेलबर्नमध्ये घडलेली ही घटना सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 97व्या षटकाच्या मध्यावर एक चाहता अचानक मैदानात पोहोचला. भारतीय संघ त्यावेळी क्षेत्ररक्षण करत होता.

चाहत्याने आधी ‘रोहित शर्मा’ला (Rohit Sharma) भेटण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो ‘विराट कोहली’ला (Virat Kohli) भेटण्यासाठी पोहोचला. त्यामुळे सामना काही वेळ थांबला. स्टेडियमच्या सुरक्षेने त्याला मैदानाबाहेर काढले, त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

दिग्गज फलंदाज ‘स्टीव्ह स्मिथ’च्या (Steve Smith) शतकामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 474 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथने 140 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान भारताकडून ‘जसप्रीत बुमराह’ने (Jasprit Bumrah) 4, तर ‘रवींद्र जडेजा’ने (Ravindra Jadeja) 3 विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद सिराजचे ‘शतक’, बुमराह-आकाशदीपची अवस्था वाईट, गोलंदाजीत भारताची चिंताजनक कामगिरी
‘जोकर’ कोहली… ऑस्ट्रेलियन मीडियाने उडवली विराटची खिल्ली, निर्लज्जपणाची सीमा पार
IND vs AUS: रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच, शेवटच्या 14 डावांमध्ये आश्चर्यकारक सरासरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---