दिल्ली। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. या चाहत्यांची एकदातरी विराटला भेटायला मिळावे अशी इच्छा असते. यासाठी अनेक चाहते वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. असाच एक चाहता शनिवारी दिल्लीतील फिरोज शहा कोटला स्टेडीयममध्ये विराटचे चित्र (पोट्रेट) घेऊन उभा होता.
इएसपीएन क्रिकइन्फो(espncricinfo)ने दिलेल्या वृत्तानुसार दुपारी 43 ड्रीग्रीपर्यंत तापमान असताना शौर्य शाही हा 19 वर्षीय तरुण फिरोजशहा कोटला स्टेडियममधील ड्रेसिंग रुमच्या शेजारी विराटचे चित्र घेऊन उभा होता. त्याच्या हातात असलेले विराटचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
शौर्य हा फाईन आर्ट्सचा विद्यार्थी असून मिरुटमध्ये विद्या इन्सटिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे त्याने हातात घेतलेले विराटचे चित्र स्वत: काढलेले होते. त्यासाठी त्याला 4 दिवस लागले.
मात्र शनिवारी विराट सरावासाठी आला नसल्याने शौर्यची त्याला भेटण्याची इच्छा अपुर्ण राहिली. शौर्यची कोटला स्टेडियमवर येण्याची ही दुसरी वेळ होती.

इसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना शौर्य म्हणाला, ‘तो(विराट) एक प्रेरणा आहे. तो तूम्हाला शिकवतो की जर तुम्ही मेहनत केली आणि विश्वास ठेवला तर तूम्हाला हवे ते मिळवू शकता.’
आज(28 एप्रिल) आयपीएलमध्ये विरा़ट कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होता. त्यामुळे विराट दिल्लीमध्ये आला होता. पण या सामन्यात बेंगलोरला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–स्टिव्ह स्मिथने घेतला डेव्हिड वॉर्नरचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–Video: त्या फलंदाजाने एक धाव घेताच संघसहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या, जाणून घ्या कारण






