रविवारी (२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना पार पडला. सध्या सुरु असलेल्या या वनडे मालिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांनतर क्रिकेट स्टेडियममध्ये चाहत्यांचा आवाज घुमत आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी मिळाल्याने वनडे मालिकेतील सिडनी येथे पार पडलेल्या दोन्ही सामन्यात चाहत्यांमध्येही उत्साह दिसून आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेत चाहते नेहमीप्रमाणे आपल्या आवडत्या संघाची जर्सी घालून प्रोत्साहन देताना दिसले. काही चाहते भारत आणि ऑस्ट्रेलियाचे झेंडे फडकावतानाही दिसले. पण या सर्वांमध्ये एका चाहत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला झेंडा फडकवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो चाहता हा झेंडा फडकवत असतानाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की दुसऱ्या वनडे सामन्यासाठी उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणता राजा असा उल्लेख असलेला भगवा झेंडा फडकवला. त्याच्या जवळच एक चाहता भारताचा तिरंगा फडकवत आहे.
https://twitter.com/PuneriSpeaks/status/1333295757722488832
विश्वचषकादरम्यानही झळकला भगवा झेंडा –
सन २०१९ ला इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या वनडे विश्वचषकातही ९ जूनला झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान एका चाहत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवला होता.
काल दिनांक 9/6/2019 रोजी भारत vs ऑस्ट्रेलिया लंडन मध्ये ओवेल या स्टेडियम वर वर्ल्ड कप मॅच चालू असताना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवताना एक गर्व आणि आनंदाचा क्षण..🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 🚩 🚩 pic.twitter.com/WBZTlfzElH— kadam nitin bhagwan (@kadamnitin007) June 10, 2019
भारताचा झाला पराभव –
ऑस्ट्रेलियामध्ये चाहत्यांकडून भरपूर प्रोत्साहन मिळाले असले तरी भारताचा पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात पराभव झाल्याने चाहते काहीसे निराश दिसले. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या वनडेत ६६ धावांनी तर दुसऱ्या वनडेत ५१ धावांनी पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजी पुन्हा ‘विकेटलेस’, सलग पाचव्यांदा दिल्या खोर्याने धावा
तिसर्या वनडेसाठी टीम इंडियामध्ये या ३ खेळाडूंना मिळू शकते संधी, तर खेळाडूंना मिळू शकतो डच्चू
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव