---Advertisement---

फ्लाईंग कॅच! सामन्याच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलिया झटका, स्नेह राणाच्या चपळाईमुळे एलिसा हिली तंबूत

Sneh Rana
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची वनडे मालिका गुरुवारी (28 डिसेंबर) सुरू झाली. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर खेळताना भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. फलंदाजीच्या बाबतीत जेमिमाह रॉड्रिग्ज हिने अप्रतिम खेळी केली, तर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत स्नेह राणा हिने स्वतःला सिद्ध केले.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 50 षटकांमध्ये भारतीय संघाने 8 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावांपर्यंत मजल मारली. जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 77 चेंडूत 82 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच पहिल्या क्रमांकावर आलेल्या यास्तिका भाटिया हिने 49 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच षटकात सलामीवीर एलिसा हिली (Alyssa Healy) हिने विकेट गमावली. रेणुका सिंग हिने भारतासाठी पहिले षटक टाकले. षटकातील तिसऱ्या चेंडूवर एलिसा हिलीने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू तिच्या बॅटच्या कोपऱ्यावर लागल्यामुळे शॉर्ड थर्डवर उभ्या असलेल्या स्नेह राणा (Sneh Rana) हिच्याकडे (Sneh Rana) गेला. भारतीय खेळाडूनेही जबरदस्त चपळाई दाखवली आणि हिलीचा झेल पकडला. हा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर केला गेला आहे.

(A flying catch by Sneh Rana sent Alyssa Healy back to the tent)

पहिल्या वनडे सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला संघ-
जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, अमनजोत कौर, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक

ऑस्ट्रेलिया महिला संघ-
फीबी लिचफील्ड, एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राऊन

महत्वाच्या बातम्या – 
पहिलं कसोटी शतक करण्याची संधी यान्सेनच्या हातून निसटली! पहिल्या डावाअंती दक्षिण आफ्रिका 163 धावांनी आघाडीवर
IND vs AUS ODI: जेमिमा अन् पूजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचे कांगारूंना 283 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---