क्रिकेटच्या मैदानात नेहमीच चौकार, षटकार आणि विकेस्टमुळे चाहत्यांचे मनोरंजन होते असे नाही. अनेकदा मैदानात अशा काही मजेशीर गोष्ट घडतात, ज्या पाहून कोणालाही हसू येईल. पाकिस्तान संघ अशा गोष्टींसाठी प्रामुख्याने ओळखला जातो. मंगळवारी (3 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात असेच काही घडले.
वनडे विश्वचषक यावर्षी भारतात खेळला जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या या स्पर्धेआधी भारतात सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. मंगळवारी (3 सप्टेंबर) आयोजित केलेल्या तीन सराव सामन्यांपैकी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan Vs Australia) यांच्यातील सामना रोमांचक झाला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान पाकिस्तान संघाकडून श्रेत्ररक्षणादरम्यान एक अशी चूक झाली, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 23व्या षटकात मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) फलंदाजी करत होता. हॅरिस रौफ या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील पहिल्याच चेंडूवर लॅबुशेन याने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट खेळला, जो क्षेत्ररक्षकांच्या हातात जाताना दिसत होता. त्याठिकाणी उभ्या असणाऱ्या मोहम्मद वसीम जुनिअर किंवा मोहम्मद नवाज यांच्यापैकी एक खेळाडू हा चेंडू पकडणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू दोघांच्या मधून सीमारेषेपार गेला.
— Cricket Videos Only (@cricketvideos23) October 3, 2023
दरम्यान, उभय संघांतील हा सामना हैदराबात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 351 धावा केल्या. यात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तसेच कॅमरून ग्रीन याने 50* धावांचे योगदान दिले. (A funny incident happened in the warm up match between Pakistan and Australia)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । पारुलने जिंकले दिवसातील पहिले सुवर्ण, अवघ्या ‘इतक्या’ मिनिटात 5000 मीटर धावली
पदार्पणाच्या सामन्यात साई किशोरला अश्रू अनावर, दिग्गज क्रिकेटपटूनेही केली भावूक पोस्ट