भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे मागील कांही दिवसांपासून टिकांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रकरणामुळे या दोघांवर बीसीसीआयने निलंबनाचीही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौराही अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले आहे.
आता तर मुंबई पोलिसांनीही या प्रकरणामुळे राहुल आणि पंड्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे. ही टिका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये म्हटले आहे की ‘दिग्गज खेळाडू कसा असतो, जो मैदानात चांगली कामगिरी करतो आणि जो मैदानाबाहेर महिलांचा आदर करतो.’
तसेच या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘कोणत्याही ठीकाणी आणि सदैव सभ्य व्यक्ती हा सभ्य व्यक्तीच असतो.’
https://twitter.com/MumbaiPolice/status/1084712231508553728
राहुल आणि पंड्या यांनी त्याच्या विधानांबद्दल माफी मागितली आहे.
या प्रकरणाबद्दल चौकशी करण्यासाठी बीसीसीआयच्या 10 यूनिट्सने विशेष बैठकीत लोकपाल नेमण्याची मागणी केली आहे. पण बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीच्या(सीओए) सदस्या डायना एडुलजी यांची अशी इच्छा आहे की ही चौकशी सीओए आणि बीसीसीआयच्या अधिकांऱ्याकडून व्हायला हवी.
सध्या चौकशी होईपर्यंत या दोन्ही क्रिकेटपटूंचे निलंबन करण्यात आले असून ते 23 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी