वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारताचा आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना पाच नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारतातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या या मैदानावर हा सामना कमालीचा रंगण्याची शक्यता आहे. आता या सामन्याची तिकिटे उपलब्ध असून त्यांचा थेट काळाबाजार सुरू झाल्याचे समोर येतेय.
A man arrested for selling India vs South Africa tickets for 11,000 rs each – the original price is 2,500 rs. [ANI] pic.twitter.com/TSy66Yq4N0
— Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2023
सध्या भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर दिसून येतो. त्यामुळे हा सामना गुणतालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगणाऱ्या या सामन्या दिवशीच भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याचा वाढदिवस देखील असून, त्यामुळे अनेक जण या सामन्यासाठी मैदानावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कोलकाता पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत एका व्यक्तीला अटक केली असून हा व्यक्ती या सामन्याची तिकिटे चढ्या किमतीने विकताना दिसला. या व्यक्तीने 20 तिकिटे मिळवली होती. ज्यांची किंमत प्रत्येकी 2500 इतकी होती. मात्र, हा व्यक्ती हे एक तिकीट तब्बल 11 हजार रुपयांना विकत असल्याचे दिसून आले.
ईडन गार्डन्स मैदानावर होणारा हा तिसरा सामना असेल. भारतीय संघ या विश्वचषकात प्रथमच या मैदानावर खेळणार आहे. तसेच भारताला या मैदानावर उपांत्य फेरीचा सामना खेळण्याची देखील संधी मिळू शकते.
(A man from Kolkata arrested for selling India Vs South Africa match tickets in black)
हेही वाचा-
भारताच्या माजी खेळाडूने गायले शाहीन आफ्रिदीचे गुणगान, इतर गोलंदाजांविषयी म्हणाला…
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल