---Advertisement---

‘ती हो म्हणाली!’ लाईव्ह क्रिकेट सामन्यात प्रियकराने केले प्रपोज; मुलीला आनंदाने अश्रू अनावर

---Advertisement---

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. यातील तिसरा सामना मँचेस्टर येथे मंगळवारी (20 जुलै) खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केले. तसेच मालिका 2-1 ने खिशात घातली. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतही इंग्लंडने 3-0 ने मालिका जिंकली होती. विशेष म्हणजे, तिसऱ्या टी20 सामन्यात असे काही घडले की, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरतर इंग्लंड आणि पाकिस्तान संघामध्ये सामना सुरू असताना एका व्यक्तीने स्टेडियममध्ये असलेल्या मुलीला थेट लग्नाची मागणी घातली. यादरम्यान सर्वच कॅमेऱ्याचे लक्ष त्या दोघांवर होते. तो व्यक्ती गुडघ्यावर बसून त्या मुलीला रिंग देत प्रपोज करतो आणि ती मुलगीही ‘हो’ म्हणत डोकं हालवते.

हे पाहून जवळ बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजवू लागतात. काही लोक त्यांच्याकडे जाऊन हात मिळवला. हे पाहून मुलगी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वतः इंग्लंड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, “ती हो म्हणाली.”

फिरकीपटू आदिल रशीदच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडने मंगळवारी मालिकेच्या अंतिम टी 20 सामन्यात पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रशीदने 35 धावा देऊन चार बळी घेतले आणि 6 गडी बाद 154 धावा केल्या.

प्रत्युत्तर देत इंग्लंड संघाला जेसन रॉयने जोरदार सुरुवात केली, परंतु त्यानंतर नियमित अंतराने संघाने विकेट्स गमावल्या. आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ख्रिस जॉर्डनने दोन चेंडू आणि तीन गडी राखून विजयी धावा केल्या. इंग्लंडने 19.4 षटकांत 7 बाद 155 धावा करुन विजय मिळविला.

महत्त्वाच्या बातम्या-

-केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

-हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

-आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---