ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर शनिवारी (9 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. उभय संघातील वनडे मालिकेचा हा दुसरा आणि निर्णायक सामना ब्लोमफॉन्टेनमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नरने कारकिर्दीतील 28वे वनडे शतक ठोकले. यावेळी त्याने आपल्या 6000 वनडे धावाही पूर्ण केल्या आणि खास यादीत चौथा क्रमांक पटकावला.
डेविड वॉर्नर (David Warner) याने दक्षिण आप्रिकेविरुद्धच्या या सामन्यात 93 चेंडूत 106 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 षटकार होते. 113.97च्या स्ट्राईक रेटने वॉर्नरने धावा केल्या असून मोठ्या काळानंतर वनडे फॉरमॅटमध्ये शतक केले. वनडेतील त्याचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध आले होतेत. त्यानंतर जवळपास 10 महिन्यांमध्ये वॉर्नर एकही वनडे शतक करू शकला नव्हता. आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वॉर्रनचे हे पुनरागमन ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगले संकेत ठरत आहेत.
दरम्यान, वॉर्नर सर्वात कमी डावांमध्ये 6000 वनडे धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 140 वनडे डावात ही कामगिरी केली. भारताचा दिग्गज रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 121 डावांमध्ये 600 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. यादीत दुसरा क्रमांका हाशिम आमला (123 डावांमध्ये) याचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे, ज्याने 133 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. वॉर्नर आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सर्वत कमी डावांमध्ये 6000 धावा करणारे फलंदाज
121 – रोहित शर्मा
123 – हाशिम आमला
133 – सचिन तेंडुलकर
140 – डेविड वॉर्नर*
140 – शिखर धवन
143 – सौरव गांगुली
ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इग्लिस, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, ऍरॉन हार्डी, शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रासी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्ट, तबरेझ शम्सी.
(A milestone from Warner in ODIs! set new record in match against South Africa )
महत्वाच्या बातम्या –
थोडक्यात हुकले शतक! बांगलादेशविरुद्ध समरविक्रमाच्या वादळी खेळी, लंकेने गाठली ‘ही’ धावसंख्या
‘आम्ही फायद्यात आहोत…’, भारताविरुद्ध खेळण्याआधी दिसला बाबर आझमचा कॉन्फिडेंस