भारतीय संघाचा क्रिकेटपटू करुण नायर याने कसोटी कारकिर्दीत चांगले प्रदर्शन केले आहे. नायरने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावले होते. आता याच नायरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. तो लवकरच वडील बनणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
नायरने त्याच्या पत्नीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे आणि सांगितले आहे की, जानेवारी 2022 मध्ये त्याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. आम्ही दोघं आई-बाबा होणार आहोत.
करुण नायरने पत्नीसोबत पोस्ट केलेल्या फोटोला कॅप्शन लिहिले की, ‘आम्हाला मनापासून खूप आनंद झाला आहे आणि आम्ही आता तुझ्या स्वागतासाठी अजून जास्त वाट पाहू शकत नाही. जानेवारी 2022 मध्ये आमच्या घरी नवीन पाहुणा घरी येणार आहे.’ त्याच बरोबर करुण नायरने #comingsoon #herewegrow #blessed, हे हॅशटॅग्ज वापरले आहे.
Our hearts are so full, and we can’t wait to hold you♥️ Arriving Jan 2022. #comingsoon #herewegrow #blessed pic.twitter.com/MKuvClimib
— Karun Nair (@karun126) July 24, 2021
खेळाडूंकडून दिल्या जात आहेत शुभेच्छा
त्याने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इंग्लंडमध्ये असलेला भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल यानेदेखील त्याचे अभिनंदन केले आहे. करुण नायरचा कर्नाटकचा साथीदार आणि भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुलने कमेंट करत नायरला आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. केएलने लिहिले की, ‘खूप खूप अभिनंदन’.
त्याचबरोबर हनुमा विहारी, भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, कार्लोस ब्रॅथवेट, जयंत यादव यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी करुण नायरचे अभिनंदन केले आहे.
करुण नायरला मिळाल्या नाहीत पुरेशा संधी
सध्या करुण नायर भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला आयपीएलमध्येही जास्त संधी मिळाली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कर्नाटककडून उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे.
आयपीएलच्या मागील हंगामात करुण नायर पंजाब किंग्ज संघामध्ये सहभागी होती. त्यानंतर आयपीएल 2021 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात सहभागी करून घेतले होते. परंतु त्याला पहिल्या टप्प्यातील एकाही सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तर युएईमध्ये होणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याला संधी मिळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
शास्त्रींच्या ‘राइट हँड’चे भारतीय संघात पुनरागमन, प्रशिक्षकाने ‘असे’ केले आपल्या मित्राचे स्वागत
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेले ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटर