भारतीय संघाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एका गंभीर प्रकरणात अडकला होता. पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया मॉडेल सपना गिल यांच्यातील वाद मागच्या काही महिन्यांमध्ये सतत चर्चेत राहिला. नुकतीच पृथ्वीला या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. शॉ आणि गिलचा रस्तावरील व्हिडिओ आधीच व्हायरल झाला होता. पण वादाची सुरुवात कशी झाली, याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सपना गिल (Sapna Gill) यांचा मुंबईतील एका रस्तावरील व्हिडिओ व्हायरल झाला होता. पृथ्वीने सपना गिलच्या मित्रासोबत सेल्फी काढण्यास नकार दिल्यामुळे हा वाद सुरू झाला, असे सांगितले जात आहे. याच कारणास्तव सपना आणि तिच्या मित्राने पृथ्वी बसलेल्या गाडीवर हल्ला केला होता. बेसबॉल बॅटने पृथ्वीच्या मित्राची बीएमडब्लू गाडी त्यांनी फोडली होती. व्हिडिओत पृथ्वी फोनवरून बोलताना आणि वाद घालताना दिसला होता. मात्र, या प्रकरणाच्या आधी नमंक काय घडलं होतं, याविषयी सर्वांनाच प्रश्न पडला होता. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात गिल आणि तिच्या मित्रांसोबत पृथ्वीने का वाद घातला, ते दिसते.
Fight between Indian Cricketer Prithvi Shaw vs Influencer Sapna Gill#PrithviShaw #SapnaGill pic.twitter.com/SX1TFfVPV6
— Kapil (@kapilkumaron) February 16, 2023
व्हिडिओत दिसते की, सपना गिलचा मित्र शोभीत ठाकूर पृथ्वीसोबत सेल्फी घेण्यासाठी जातो. पण पृथ्वीला मात्र, या अनोळखी व्यक्तिसोबत घेण्यात रस नव्हता. यातूनच दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे दिसते. यावेळी पृथ्वीचे मित्र देखील त्याठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी ठाकूर आणि पृथ्वीला एकमेकांसापासून दून नेले. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नेटकरी यावर वेगवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
https://twitter.com/Sportslive91091/status/1674303176772825089?s=20
मुंबईतील एका पबमध्ये हा वाद झाला असून नंतर हा वाद रस्त्यावर देखील झाला. भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने सपना गिल आणि तिच्या मित्रांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे सपनाने देखील पृथ्वीविरुद्ध आरोप केला होता. तसेच विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला होता. पृथ्वी शॉला या गुन्ह्यातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यानंतर कोर्टाने सपना आणि तिच्या मित्रांना न्यायलयीन कोठडीची शिक्षा सुनावली होती. सपनाला जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये पृथ्वी आणि त्याचे मित्र निर्दोष असल्याचे सांगितले गेले. (A new video of the Prithvi Shaw Sapna Gill controversy )
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: ड्रीम 11 बनला टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक, चार वर्षांसाठी छातीवर लागणार लोगो
महिला सीपीएल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू; टीम इंडियाकडून खेळण्याआधी श्रेयांका पाटीलला संधी