मागील काही दिवसांपासून भारतीय संघ मुख्य प्रायोजकाविना मैदानात उतरत होता. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या मुख्य प्रयोगाची घोषणा केली असून, गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक असेल. पुढील चार वर्षांसाठी हा करार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून ड्रीम 11 लोगो भारतीय संघाच्या जर्सीच्या पुढील बाजूस दिसेल.
🚨 NEWS 🚨: BCCI announces Dream11 as the new #TeamIndia Lead Sponsor.
More Details 🔽https://t.co/fsKM7sf5C8
— BCCI (@BCCI) July 1, 2023
बीसीसीआयने अधिकृत ट्विट करत याबाबत माहिती दिली. ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असलेल्या बायजूसने आपला करार संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बीसीसीआयने मुख्य प्रायोजक पदासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये अखेर ड्रीम 11 ची निवड केली गेली. या कराराच्या रकमेची अद्याप घोषणा झाली नसली तरी, ही रक्कम काही हजार कोटींमध्ये असण्याची शक्यता आहे.
ड्रीम 11 यापूर्वी एक वर्ष आयपीएलची मुख्य प्रायोजक राहिली आहे. त्याशिवाय आयपीएलच्या तसेच बीसीसीआयच्या अनेक स्पर्धांमध्ये ते नेहमी प्रायोजक म्हणून असतात. यासोबतच अनेक प्रमुख भारतीय क्रिकेटपटू या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
बातमी अपडेट होत आहे
(Dream 11 Becomes Team India New lead Sponsor Till 2027)
महत्वाच्या बातम्या-
MPL मधून मिळाली महाराष्ट्राची ‘यंग ब्रिगेड’! भविष्यात ठोठावतील टीम इंडियाचे दार
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा